Maharashtra

काठीपाडा येथे शेतक-याचा ट्रक्टरखाली दबून जागीच मृत्यू.

काठीपाडा येथे शेतक-याचा ट्रक्टरखाली दबून जागीच मृत्यू.

विजय कानडे

काठीपाडा येथे भात लागवड करीता चिखलणी करुन घराकडे परतत
असताना ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने पासिंग न झालेला नवीन ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या घटनेत चालक आदिवासी युवा शेतक-याचा दबून जागीच मृत्यू झाल्याने परिसरातील हळहळत व्यक्त करण्यात येत असून गावावर शोककळा पसरली आहे.काठीपाडा शिवारात भात लावणी करीता चिखल करुन झाल्यानंतर मयत शेतकरी संजय मोतीराम दोडके वय 29 रा.काठीपाडा याने खाचरातून निघत असतांना गुडघाभर चिखलातून ट्रॅक्टर बाहेर काढतांना बांधावरून उतरत असताना अंदाज न आल्याने त्याचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर जागीच भाताच्या आवणात पलटी झाला . हि घटना दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. यामध्ये संजय दोडके हा दबला गेला.जीव वाचविण्या करीता जीवाचा आटापिटा करत होता.मला वाचवा ! मला वाचवा असे ओरडत होता.

आजूबाजूच्या शेतातील शेतक-यांना घटना समजताच त्यांनी धाव घेऊन मदत करण्याची धडपड केली मात्र यंत्रापुढे मनुष्यबळ कमी पडल्यामुळे जीव गमवावा लागला.
मात्र पलटी झालेला ट्रॅक्टर उचलण्या करीता कोणत्याही प्रकारची क्रेन सारखी सोय नसल्याने तो जागीच गतप्राण झाला. पतीचा मृत्यू पत्नीला व मुलांना डोळ्यांनी पहायची घटनेची नामुष्की एका दुर्भाग्य पत्नीवर ओढविल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे.
अशी माहिती पोलीस पाटील सिताराम चौधरी यांनी दिली आहे.याबाबत रात्री उशीरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.याबाबत पुढील तपास पोलिस निरीक्षक सागर नांद्रे , चंद्रकांत दवंगे हे करीत आहेत.रात्री उशिरा पर्यंत शवविच्छेदन करण्याच काम सुरु होते.सुरु होते.
मयताच्या पश्चात पत्नी दिपाली,मुलगा,मुलगी आईवडील असा परिवार आहे.
फोटो- काठीपाडा येथील मयत शेतकरी संतोष मोतीराम दोडके.
# भाताच्या आवणात ताबा सुटल्याने पलटी झालेला ट्रक्टर.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button