धनाजी नाना महाविद्यालयात मुक्त विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया सुरू
सलीम पिंजारी
फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2020-2021 साठी ची विविध शिक्षणक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे. मागील वर्ष्याप्रमाणे या वर्षीही प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. मागील वर्षी एफ वाय आणि एस वाय या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी पुढील वर्गात थेट प्रवेश घ्यावा. धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथील अभ्यास केंद्रात बीए, बी कॉम, बी सी ए, एम सी ए, आणि एम बी ए या अभ्यासक्रमासाठीचे प्रवेश सुरू आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेश अर्ज घरूनच भरावा यासोबत कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन नियमांचे तंतोतंत पालन करावे. अद्ययावत माहितीसाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या संकेतस्थळाला भेट देऊन प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केंद्राचे शुल्क भीम ॲप तथा तत्सम ऑनलाइन पेमेंट प्रक्रियेचा वापर करून प्रवेश निश्चित करावा असे आवाहन महाविद्यालयातील अभ्यास केंद्र प्रमुख तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी आणि अभ्यास केंद्र संयोजक प्राध्यापक डॉ एन एल चव्हाण यांनी केले आहे.






