Maharashtra

डाॅ.पायल तडवी मृत्यु प्रकरणातील आरोपी तिन्ही डाॅक्टरांचे निलंबन करा -नॅशनल जयस राज्यपालांकडे निवेदनाद्वारे मागणी

डाॅ.पायल तडवी मृत्यु प्रकरणातील आरोपी तिन्ही डाॅक्टरांचे निलंबन करा -नॅशनल जयस राज्यपालांकडे निवेदनाद्वारे मागणी

प्रतिनिधी मुबारक तडवी

जय आदिवासी युवा शक्ती (जयस) महाराष्ट्र प्रदेश शाखा जळगाव वतीने डॉ पायल तडवी यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले सहकारी आरोपी तिन्ही महिला डॉक्टर यांचे परवाने निलंबित करण्याची मागणी महामहीम राज्यपाल कार्यालयास तक्रार निवेदन देऊन तक्रार केली आहे डाॅक्टर पायल तडवी ही आदिवासी समाजातील तरुणी वैद्यकीय शिक्षण घेत असताना रॅगिंग सारख्या वाईट प्रवृत्तीच्या प्रकारातून बळी पडली आहे.डाॅक्टर पायल तडवी यांच्यावर आत्महत्या,जातीय अत्याचार आणि रॅगिंग यासाठी डॉ भक्ती मेहेरे, डॉ अंकिता खंडेलवाल, डॉ हेमा आहुजा या तिन्ही डाॅक्टरांनी गंभीर गुन्हा केला म्हणून कोठडीत होते.मा.उच्च न्यायालयाने एमएमसी मधील नोंदणी स्थगित केली आहे परंतु नंतर कोर्टाने पुन्हा निर्देश दिले होते की नोंदणी स्थगित करण्याची बाब ही एमएमसी कार्यक्षेत्रात येते आणि म्हणूनच हा निर्णय महापालिकेवर सोडण्यात आला.परंतु सदर विषयावर डॉ पायल तडवी यांच्या आई श्रीमती आबेदा तडवी यांनी एमएमसी कडे नोंदवलेल्या तक्रारी नंतर देखील तिन्ही आरोपी विरोधात एमएमसीने चौकशी करण्यास टाळाटाळ केली व त्यांचे निलंबन रद्द केले आहे.सदर बाब ही धक्कादायक असून सदर विषय गंभीर आहे.तरी तिन्ही डाॅक्टरांचे तातडीने निलंबन करण्यात यावे अन्यथा पुन्हा एकदा आदिवासी समाज रस्त्यावर उतरून आपली भूमिका स्पष्ट करेल असा इशारा निवेदन सादर केले आहे.
जयस जळगांव जिल्हा प्रभारी व संरक्षक सुलतान तडवी
यांनी महामहीम राज्यपाल, मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button