शिरुड येथे आ.अनिल पाटील यांच्या हस्ते
जि.प. शाळेचे वॉल कंपाऊंड बांधकामा चे भूमिपूजन व परिसरात वृक्षारोपण
रजनीकांत पाटील
अमळनेर तालुक्यातील शिरूड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वॉल कंपाउंड बांधकामाचे चे भूमिपूजन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले
या साठी लागणार निधी म.ग्रा.रो. हमी योजना डी.पी.डी. सी आणि 14 वित्त आयोग योजनेचा अनुदानातुन प्राप्त होणार आहे सदर भूमिपुजनाच्या वेळी शाळे भोवती वृक्षारोपण देखील करण्यात आले तसेच आ अनिल पाटील यांचा गावातील ग्रामपंचायत म्हदे बोलवून सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या वेळी जिल्हा बँक संचालीका तिलोत्तमा पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस युवक चे विनोद सोनवणे,वि वि का सो चे प्रा.शुभाष पाटील केंद्र प्रमुख रवींद्र साळुंखे गावातील सरपंच सुपडू पाटील,ग्रामसेवक गुलाबराव सुर्यवंशी, सदस्य सुनिता पाटील पत्रकार शरद कुलकर्णी, पत्रकार रजनीकांत पाटील, जयवंतराव पाटील,जि.प शिक्षण चंद्रकांत पाटील,अशोक पाटील,विनोद पाटील,संगीता पाटील गावातील सागर पाटील,अंकित पाटील, प्रल्हाद पाटील आदींची उपस्थिती होती






