आदिवासी रणरागिनी चिखली गावच्या सरपंच अनिता आढारी यांना कोरोना योध्दा पुरस्कार
पुणे प्रतिनीधी – दिलीप आंबवणे
लांडेवाडी येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योद्धा पुरस्काराचे वाटप करण्यात आले.
चिखली तालुका आंबेगाव येथील विद्यमान सरपंच अनिता विजय आढारी यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार शिवसेनेचे उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
त्यावेळी तहसीलदार रमा जोशी, पंचायत समिती सदस्य राजाराम भाऊ बाणखिले, माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अरुण भाऊ गिरे, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय आढारी, तसेच शिरूर मतदार संघातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
त्यावेळेस आदिवासी रणरागिनी म्हणून अनिता आढारी यांचा कोरोना योद्धा म्हणून गौरवण्यात आले. चिखली गावचा रहिवाशी असून त्यांनी खूप मेहनत घेतली व आपल्या गावात साबण, सॅनिटायझर, औषध फवारणी यासारखी कामे केली. तसेच नागरिकांना सोशल डिस्टन पाडण्याचे समजून सांगितले. बाहेरून आपण घरी आल्यावर पहिल्या हात पाय साबनाने धुणे, आंघोळ करणे मग घरामध्ये प्रवेश करणे असे त्यांनी मार्गदर्शन केले. चिखली या गावी एस. एम. सुपे फाउंडेशन च्या वतीने बाराशे लोकांना प्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी अर्सेनिक अल्बम 30 या होमिओपँथिक गोळ्या वाटप करण्यात आल्या त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या काही गोरगरीब लोकांना शिवसेनेच्या माध्यमातून अन्नधान्याचा पुरवठा केला.
सोशल डिस्टन्स चे अंतर पाळून कार्यक्रम पार पडला. त्यावेळी सूत्रसंचालन अरुण गिरे यांनी केले.






