Maharashtra

धनगर प्रवर्गातील नागरिकांसाठी ग्रामीण भागात घरकूल योजना

धनगर प्रवर्गातील नागरिकांसाठी ग्रामीण भागात घरकूल योजना

प्रतिनिधी फहिम शेख

नंदुरबार दि. 24 (जिमाका वृत्तसेवा) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यातील ग्रामीण भागातील विकासापासून दूर असलेल्या विमुक्त जाती, भटक्या धनगर प्रवर्गातील समाजाच्या नागरिकांसाठी ग्रामीण भागात घरकुल योजना राबविण्यात येत आहे.

ही योजना वैयक्तीक सामुहिक लाभाची आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेच्या धरतीवर ग्रामीण क्षेत्रात वास्तव्य करीत असलेल्या व मागील किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्यात वास्तव्य असलेल्या भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या बेघर कुटुंबांना घरकूल बांधून देण्यासाठी ही योजना आहे.

या योजनेच्या लाभासाठी पात्रताधारक लाभार्थ्यांनी अटी शर्तींच्या अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन टोकरतलावरोड नंदुरबार येथे सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त राकेश महाजन यांनी केले आहे.

0 0 0 0 0 0 0

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button