Maharashtra

खामखेडा येथील आया माऊली रस्ता क्रॉंकटी करण कामास सुरुवात खामखेडा गावाची गतवैभवाकडे वाटचाल

खामखेडा येथील आया माऊली रस्ता क्रॉंकटी करण कामास सुरुवात
खामखेडा गावाची गतवैभवाकडे वाटचाल

प्रतिनिधी महेश शिरोरे

देवळा तालुक्यातील खामखेडा गावातील श्रीराम मंदिरापासून ते आया माऊली पर्यन्त जाणाऱ्या रस्त्याच्या क्रॉंकँटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला,असून चौदाव्या वित्त आयोग आणि लोकवर्गणी मधून या रस्त्याच्या कामाचे दर्जेदार काम प्रगती पथावर चालू करण्यात आले आहे. आया माऊल्या पर्यन्त जायला रस्ता नसल्याने सासुरवशींनी काटेरी झुडुपातून रस्ता काढत माऊली पर्यन्त पोहचत होत्या आता मात्र इथून पुढे चारचाकी वाहन जाईल असा सिमेंट चा रस्ता तयार करण्यात येत असून सर्वांनी आनंद व्यक्त केला आहे .तसेच याआधी खामखेडा गावात देखील 25/25 अंतर्गत जिल्हा परिषद मूलभूत सुविधा विकास योजनेअंतर्गत रस्ता क्रॉंकटीकरणाचे काम करण्यात आले .गावातील ग्रामपंचायत ते आदिवासी वस्ती येथील सर्व रस्ता क्रॉकटीकरण करण्यात आला आहे.
चांगल्या प्रकारचे काम सुरू असल्याने गाव सुशोभीकरण झाले आहे.
तर काही गल्लीत फेव्हर ब्लॉक बसविण्यात आले असून गल्ली तर रंगीबेरंगी झाल्याने चकचकाकीत झाली आहे. तर खामखेडा गाव हे एक उत्कृष्ट असे गाव असल्याने सर्व सुख सोयी या गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. गावात शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले असून गावातील बऱ्यापैकी आजार कमी झालेले असून , ग्रामस्थांचे बरेचशे आजार पळून गेले कारण पाणी चांगले असले तर कोणत्याही प्रकारचा आजार सहसा होत नाही.त्यामुळे संपूर्ण गाव हे पाच रुपयात सोळा लिटर पाणी एटीएम द्वारे ग्रामपंचायत येथून भरून घेऊन जातात. खामखेडा गावातील सर्व रस्ते हे क्रॉकटीकरण होत असल्यामुळे धुळीचे प्रमाण देखील कमी होऊन जाईल व आरोग्याला होणारे धुळीचे शरीरावर होणारे घातक परिणाम देखील कमी होण्यास मदत होईल .जिल्हा परिषद मूलभूत सुविधा सेवा 25/25 अंतर्गत खामखेडा गावात संपूर्ण गावातील रस्त्यावर क्रॉंकटी करन झालेले आहे. खामखेडा गावातील सर्व महिला , सासरी गेलेल्या मुली, दरवर्षी आया मावल्याच्या दर्शनासाठी येत असतात आणि त्यांना आइमावली पर्यन्त जायला रस्ता नसल्यामुळे खूपच मोठी कसरत करावी लागत होती तसेच त्या ठिकाणी पाणवठ्या असून तिथेच ग्रामपंचायतीची विहीर देखील आहे त्या विहिरीवर जायला सुद्धा रस्ता नव्हता सर्विकडे काटेरी बाभले, व काटेकुंटे होती मात्र आता इथून पुढे त्या ठिकानी जाणाऱ्या ला कोणत्याही प्रकारची तकलीफ होणार नसून थेट तिथपर्यंत चारचाकी वाहन जाईल अशी सोय करण्यात आली आहे.या रस्त्याच्या चौदाव्या वित्त आयोगाच्या क्रॉंकटी करणं रत्याच्या कामाची प्रत चांगली असल्याने ठेकेदार दिनेश सोनार हे काम व्यवस्थित रित्या पूर्ण करून देत असल्याने ग्रामस्थानी त्यांचे आभार देखील मानले. लाखो रुपये खर्च करून कामाची प्रतवारी चांगली असली की रस्त्याचे आयुष्य देखील सुधारते. या सर्व खामखेडा गावातील कामाचे श्रेय माजी आरोग्यमंत्री दौलतराव सोनूजी आहेर , चांदवड देवळा मतदार संघाचे विद्यमान आमदार डॉ राहुल दादा आहेर, नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष केदा नाना आहेर ,खासदार भारती ताई पवार यांचे असून या सर्व कामात सरपंच उखड्याबाई पवार,उपसरपंच संजय मोरे, वसाकाचे माजी संचालक आण्णा पाटील , माजी दादाजी बोरसे, बापू शेवाळे, , मीनाक्षी शेवाळे, शकुंतला शेवाळे, संगीता सोनवणे, मंगल सोनवणे, रामचंद्र बोरसे, हरी पवार, यांनी अथक परिश्रम घेऊन संपूर्ण गावातील रस्ता सुशोभीकरणा बरोबर ,गावातील कचरा टाकण्यासाठी जागोजागी कचराकुंडी बसविण्यात आल्या, तर जेष्ठ नागरिकाना बसण्यासाठी गावात , खामखेडा हद्दीतील रस्त्यांच्या थांब्यावर सिमेंट बाक बसविण्यात आले .साडेतीनशेवर्षा पूर्वीची बुटेश्वर विहीर दुरुस्त करून जनावरांना पिण्याचे पाणी हाळ बांधून उपलब्ध करून दिले. तर अद्ययावत अशी स्मशानभूमी बांधली असून बसण्यासाठी शेड बांधण्याचे काम प्रगती पथावर आहे.तर बुटेश्वर , नवश्या गणपती मांगबारी घाट, फांगदर, लायकेश्वर , स्थळवस्ती , जय भवानी मंदिर, आशा बऱ्याच ठिकाणी सौर ऊर्जेचे लाईट बसविण्यात आले आहेत.गावातील सर्व गटारी या पाईप टाकून अंडरग्राऊंड करण्यात आल्या आहेत.गावात प्रभू रामचंद्राचे भव्य दिव्य मंदिर, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्रशस्त अंगणवाडी, प्राथमिक शाळा, पशुवैद्यकीय दवाखाना, मंगलकार्यालय , भऊर खामखेडा गिरणा नदीवरील मोठा पूल , दोन लाख लिटर क्षमतेची आलिशान पाण्याची टाकी असून,तलाठी कार्यालयाची दिमाखदार इमारत उभी असून एक आगळा वेगळा आदर्श निर्माण करणारी कलापथक , तीन भजनी मंडळ ,भव्य दिव्य असा रथ, पाणी पुरवठ्याच्या विहिरी ,असे अनेक प्रकल्प हे पंडित शेवाळे, माजी सरपंच संतोष भाऊ मोरे , वासाकाचे माजी संचालक आण्णा पाटील, शांताराम शेवाळे, नानाजी मोरे, गोकुळ मोरे,रमेश मोरे, दादाजी बोरसे, शांताराम शेवाळे, ,साहेबराव शेवाळे, आदींच्या कारकिर्दीत झालेले आहेत. असून सोसायटीचे माजी चेअरमन सुनील शेवाळे , समाधान आहेर, धनंजय शेवाळे, ओंकार शेवाळे, संतोष मोरे, मुकुंद बोरसे, सुधाकर शिरोरे ,सुरेश शिरोरे, अरुण शेवाळे, नितीन शेवाळे, जीभाऊ बोरसे भाऊसाहेब बोरसे, शिवाजी बोरसे, ,उषा बोरसे, आदी सदस्यांचा देखील मोठ्या प्रमाणात खामखेडा गावातील कामात सहभाग आहे.

छाया- महेश शिरोरे) खामखेडा येथील रस्ता क्रॉंकटीकरणाचा शुभारंभ करताना सरपंच सौ उखड्याबाई पवार, उपसरपंच संजय मोरे, आण्णा पाटील ,सुनील शेवाळे, बापू शेवाळे, दादाजी बोरसे, निवृत्ती बिरारी, विजय जाधव,विजय शिरसाठ, कडू बच्छाव, ठेकेदार दिनेश सोनार आदींसह )

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button