Maharashtra

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पीक कर्ज द्या, भाजपा च्या वतीने येवला तहसीलदार रोहिदास वारुळे यांच्याकडे निवेदनद्वारे मागणी.

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पीक कर्ज द्या, भाजपा च्या वतीने येवला तहसीलदार रोहिदास वारुळे यांच्याकडे निवेदनद्वारे मागणी.

प्रतिनिधी शांताराम दुनबळे

नाशिक -:महाराष्ट्रातील शेतकरी अत्यंत बिकट अवस्थेत असताना आज शेतकऱ्यांकडे बी बियाणे व खते घेण्याकरता पैसे नाहीत. पाऊस बरा आहे मात्र शासनाने आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना अशी शेतकर्‍यांची अवस्था केली आहे. ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना कर्ज देण्यास विविध कार्यकारी संस्था नकार देत असून आम्हाला महात्मा फुले कर्ज मुक्ती योजना अंतर्गत बसलेल्या शेतकऱ्यांना कर्ज देण्याचे धोरण जिल्हा बँकेने ठरवले असल्याचे संस्था सचिव सांगतात मात्र याबरोबरच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ही कर्ज देण्यात यावे, देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री असताना कर्ज मुक्ती केलेल्या शेतकऱ्यांनाही कर्ज देण्यात यावे, शेतकऱ्यांच्या हितासाठी या गोंडस नावाखाली काही राजकीय मोठ्या पुढाऱ्यांनी संस्था स्थापन करून युरिया सह मोठा खतांचा साठा करून काळाबाजार करून खते विकत आहे. आज शेतकऱ्यांना युरिया खते उपलब्ध नाहीत. शेतकऱ्यांना तात्काळ खते उपलब्ध करून द्या, कोरोना प्रादुर्भावामुळे दूध धंदा अडचणीत आला असून शासनाने शेतकऱ्यांना प्रति लिटर दहा रुपये अनुदान द्यावे व दूध धंदा ह्यासाठी शेतकऱ्यांना शासनाने कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून द्यावे असे निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर भाजपा तालुका अध्यक्ष डॉक्टर नंदकिशोर शिंदे , भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबा डमाळे, माजी शहराध्यक्ष आनंद शिंदे , संघटन सरचिटणीस प्रा. नानासाहेब लहरे, गोरख खैरनार, सरचिटणीस संतोष काटे ,युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष संतोष कैंदे ,बाळासाहेब कुरे, युवराज पाटोळे बाळासाहेब होळकर, केदरनाथ वेळांजकर, विनोद बोराडे ,मच्छिंद्र हाडोळे, आदींच्या सह्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button