Maharashtra

इनरव्हील क्लबतर्फे वृक्षारोपणद्वारे श्रावण महिन्याचे स्वागत

इनरव्हील क्लबतर्फे वृक्षारोपणद्वारे श्रावण महिन्याचे स्वागत

प्रतिनिधी लतीश जैन

चोपडा चातुर्मासात श्रावण महिना सुरू झाला असून श्रावण सरींच्या चिंब वर्षावात सर्वत्र हिरवाईने आपल्या मनात एक आगळा वेगळा निसर्गानंद निर्माण झालेला असतो .अश्याच आल्हाददायक वातावरणात चोपडा येथील इनरव्हील क्लबच्या महिला भगिनी सदस्यांनी व नाव निर्वाचित पदाधिकारी यांनी श्रावणी स्वागतासाठी आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात 50 वृक्षांची लागवड केली.

हतनूर कॉलोनी परिसरात श्री अष्ट विनायक मंदिर परिसरात संपन्न या कार्यक्रमप्रसंगी क्लबच्या अध्यक्ष शैला सोमाणी ,सचिव अंकिता जैन ,माजी अध्यक्ष डॉ .कांचन टिल्लू , ज्येष्ठ सदस्य ज्योती वारके , सीसी सौ.किरण पालिवाल, मीना पोतदार,चेतना बडगुजर, सीमा पाटील,चंचल जैस्वाल,पारुल जैन आदि उपस्थित होते.

याप्रसंगी वृक्षारोपण व पर्यावरण शुद्धीकरण यामुळे मानवी आरोग्य निरामयी राहात असल्याने कोरोना संकट काळात ऑक्सिजनची नितांत आवश्यकता असते ,त्याकरिता सर्वांना वृक्षांची निगा राखणे व वृक्षसंगोपन करणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ कांचन टिल्लू यांनी केले .
सोशल डिस्टन्स पालन करीत उपस्थित सर्वांनी हा परिसर व तेथील सार्वजनिक ठिकाणी ओपन स्पेस मध्ये वृक्षारोपण द्वारे परिसर विकासासाठी इनरव्हील क्लब आगामी काळात प्रयत्नशील राहणार असल्याचे यावेळी अध्यक्ष शैला सोमाणी व सचिव अंकिता जैन यांनी सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button