कै.श्रीराम तात्या सूर्यवंशी यांच्या पाचव्या पुण्यस्मरणार्थ ‘युवा ग्रुप डोंजा व के.के बॉईज बंगळवाडी’ यांच्या प्रेरणेने संसद आदर्श ग्रामपंचायत डोंजा मधील १०३ जणांचे रक्तदान
प्रतिनिधी सुरेश बागडे
कोरोना विषाणूचा संसर्ग काळात वाढती रुग्ण संख्या व रक्ताचा तुटवडा पाहता रक्तसंकलन गरजेचे असल्याने संसद आदर्श ग्राम डोंजा मधील कै.श्रीराम तात्या सूर्यवंशी यांच्या पाचव्या पुण्यस्मरणार्थ ‘युवा ग्रुप डोंजा व के .के बॉईज बंगळवाडी’ यांच्या प्रेरणेने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले या रक्तदान शिबिरात १०३ रक्तदात्यांनी सहभाग घेतला.शिबिराचे उद्घाटन संसद आदर्श ग्राम डोंज्याचे विद्यमान उपसरपंच ॲड. वीरेंद्र पाटील यांनी केले .
या वेळी कै.श्रीराम सूर्यवंशी यांचे ज्येष्ठ बंधू मेजर संतोष सुर्यवंशी, मेजर हनुमंत घोगरे, मेजर बंडू घोगरे, मेजर भालचंद्र घोगरे ,ॲड. नागनाथ सूर्यवंशी, तुकाराम पाटील, ज्योतीराम घोगरे, युवा नेते आकाश सूर्यवंशी ,सचिन सूर्यवंशी ,अतुल सूर्यवंशी ,सचिन घोगरे सर ,दिनकर घोगरे ,मनोज तांबे ,भारत मोरे ,धनंजय पाटील ज्ञानेश्वर भाग्यवंत सुनील घोगरे , रवींद्र शिरसट आदी उपस्थित होते.
प्रत्येक रक्तदात्यास सॅनिटायझर व मास्क भेट दिला. रक्त संकलन शिबिरासाठी बार्शी येथील श्री भगवंत ब्लड बँकेचे जनसंपर्क अधिकारी गणेश जगदाळे व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.






