अन विधानसभा उपाध्यक्ष यांनी झाडाखाली बैठक मारत साधला जनतेशी संवाद
प्रतिनिधी सुनिल घुमरे
दिंडोरी : विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आज शासकीय अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेऊन वणी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित केली.यावेळी कार्यकर्ते व ग्रामस्थ ही उपस्थित होते ते थोडा वेळ त्यांना सर्वांना झिरवाळ यांनी बाजूला बसायला सांगत बैठक होताच आपण बोलू असे
सांगितले विविध कामे घेऊन आलेले नागरिक बाजूला झाडाखाली बसत बैठक आटोपण्याची वाट बघत होते अन साधारणतः तासाभरानंतर बैठक आटोपली अन झिरवाळ हे थेट नागरिकमध्ये जाऊन बसले आलेल्या वेगवेगळ्या लोकांशी तिथेच चर्चा केली संबंधित अधिकाऱ्यांशी मोबाईलवर बोलून कामे मार्गी लावत होते तब्बल तीन तास हा जनता दरबार झाडाखाली सुरू होता.
एकीकडे प्रश्न सोडवत असताना येवला येथील एक कार्यकर्त्यांचा मुलगा दहावीत 98 टक्के गुण मिळवत उत्तीर्ण झाला समजले त्यांनी त्याचे कौतुक करत त्याचे वडिलांचा सत्कार केला.
विधानसभा उपाध्यक्ष झाले तरीही झिरवाळ यांनी जनतेत मिसळणे कायम ठेवले आहे.ज्या जनतेने आपल्याला संधी दिली त्यांच्यासाठी मला कोणताही प्रोटोकॉल आड येणार नाही व येऊ नये जनतेत राहून जनतेचे प्रश्न सोडवणे यासाठी आपण कार्यरत राहू असे झिरवाळ यांनी सांगितले






