निंभोरा येथे कोरोनाचा चढता आलेख
आणखी पाच रुग्णांना कोरोना संसर्गाची बाधा
प्रतिनिधी संदीप कोळी
निंभोरा बु.ता रावेर येथे अलीकडच्या काळात कोरोना चा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच असल्याचे चित्र दिसते आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये गावातील पुन्हा 5 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे गावात एकूण 8 कंटेनमेंट झोन झाले असून महत्त्वाची व दिलासादायक बातमी अशी की नाभिक समाजाच्या तिघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.आज आढळलेल्या बाधित रुग्णांमध्ये पाचही महिलांचा समावेश असून त्यामध्ये 12 वर्षीय व नऊ वर्षीय लहानग्या मुलींचा तर महिलांमध्ये 25 वर्षीय 27 वर्षीय व 55 वर्षीय महिलांचा समावेश आहे .गावातील कोरोना बाधांचा आलेख दिवसेंदिवस वाढतच असून परिसरात चिंतेच्या वातावरणात मोठी भर पडली आहे यामुळे निंभोरा वासियांची एकूण कोरोना बाधितांची संख्या 30 झाली असून नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.
*सरपंच डीगंबर चौधरी*-
कोरोनाला लढा देण्यासाठी नागरिकांनी घाबरून न जाता आता ही स्वतःची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स व मास्क लावणे,व अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर निघू नये अशा शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे व कोरोनावर मात करावी






