पहा हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता कोणत्या ग्रीक गॉड अभिनेत्याचा आहे फॅन..
मुंबई….
विकीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये
बॉलिवूडचा ‘ग्रीक गॉड’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता हृतिक रोशनही दिसत आहे. ‘ड्रॉव्हर साफ करताना मला हा फोटो सापडला. मी हृतिकच्या ‘फिदा’ चित्रपटाच्या सेटवर गेलो होतो तेव्हाचा हा फोटो आहे. त्यावेळी ‘कहो ना प्यार है’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता आणि मीसुद्धा त्याच्या असंख्य चाहत्यांपैकीच एक होतो. त्यावेळी मला सांगण्यात आलं होतं की, हृतिक त्यांनाच भेटतो ज्यांना ‘इक पल का जीना’ या गाण्यावर नाचता येतं.
मीसुद्धा त्या व्यक्तीच्या सांगण्यावर विश्वास ठेवून तीन दिवस या गाण्यावर नाचण्याची प्रॅक्टीस केली होती. पण, ज्यावेळी मी हृतिकला भेटलो, तेव्हाचा तो क्षण मी शब्दातही मांडू शकत नाही. तो नेहमीच प्रेरणा देत राहील…’, असं भलंमोठं कॅप्शन विकीने या फोटोला दिलं आहे.त्याच्या या कॅप्शनमधून एक अभिनेता म्हणून नव्हे तर, एक सर्वसामान्य चाहता म्हणून त्याने भावना व्यक्त केल्या. विकी सध्याच्या घडीला चांगलाच नावाजला जात आहे. ‘मसान’ या चित्रपटातील भूमिकेमुळे त्याला बरीच प्रसिद्धी मिळाली होती. नुकतंच त्याला ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.








