Maharashtra

Big Breking पनवेल : धक्कादायक, पनवेल कॉरंटाईन सेंटरमध्ये महिलेवर बलात्कार

Big Breking पनवेल : धक्कादायक, पनवेल कॉरंटाईन सेंटरमध्ये महिलेवर बलात्कार

प्रातिनिधी शेख फरीद

पनवेलमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेल्या एका महिलेवर क्वारंटाईन असलेल्याच एका युवकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर घटनेमुळे पनवेल मधील क्वारंटाईन सेंटरची सुरक्षा धोक्यात आली आहे. सदर प्रकारामुळे पनवेलमध्ये एकच खळबळ माजली आहे. महिलांच्या क्वारंटाईन कक्षाकडे पुरुष रुग्ण पोहचला कसा? सुरक्षा यंत्रणा, प्रशासन यंत्रणा काय करत होती? असे अनेक प्रश्न निर्माण केले जात आहेत.

संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या महामारीवर मात करण्यासाठी झगडते आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासन- प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहे. या नुसारच पनवेल आणि नवी मुंबई परिसरातील कोरोना संशंयीतांना किंवा हाय रिस्क लोकांना क्वारंटाईनची व्यवस्था कोण गाव येथील इंडिया बुल्स येथे करण्यात आली आहे. या इमारतीतच हा धक्कादायक प्रकार समोर आला.

संबधित प्रकार गुरूवारी मध्यरात्री घडल्याचा खुलासा सूत्रांकडून सांगण्यात येत असून क्वारंटाईन सेंटमध्येच कोरोना संशयीत म्हणून दाखल झालेल्या एका महिलेवर एका विकृत तरुणाने बलात्कार केल्याची माहिती पनवेल तालुका पोलिस ठाण्याच्या वतीने देण्यात आली आहे. सध्यस्थीतीत पनवेल महापालिका प्रशासन कोरोनाला रोखण्यासाठी अनेक प्रयत्न करीत आहेत. मात्र, थेट रुग्णाने अशी विकृती केल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे.

पोलिसांनी याबाबत तत्काळ कारवाई करत कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पनवेल पोलिस अधिक तपास करत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button