Maharashtra

प्रक्षाळ पूजेच्या वेळी विठ्ठल मंदिरात जो प्रकार घडला तो निंदनीय व वेदनादायी आहे  संतोष माने विठ्ठल जोशी व त्या कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्याची माने यांची मागणी

प्रक्षाळ पूजेच्या वेळी विठ्ठल मंदिरात जो प्रकार घडला तो निंदनीय व वेदनादायी आहे संतोष माने विठ्ठल जोशी व त्या कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्याची माने यांची मागणी

प्रतिनिधी रफीक आत्तार

पंढरपूर शहरामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने प्रक्षाळ पूजेच्या वेळी विठ्ठल मंदिरात जो प्रकार घडला तो निंदनीय व वेदनादायी असल्याचे मत पंढरपूर – मंगळवेढा मतदार संघाचे नेते संतोष माने यांनी व्यक्त केले आहे.
माने म्हणाले कि दोन दिवसा पूर्वी विठ्ठल मंदिरातील विठ्ठलाच्या समोर विठ्ठल जोशी नामक अधिकाऱ्यास विठ्ठल मंदिरात विठ्ठलाची पूजा करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पांडुरंगाच्या जलाभिषेकासाठी वापरण्यात येणाऱ्या गढव्याने (तांब्याचे भांडे ) गाभाऱ्यातच अंघोळ घातली.एक तर कोरोनामुळे आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला येता न आल्यामुळे समस्त वारकरी सांप्रदाय व्याकूळ झाला आहे. अशातच पांडुरंगाच्या भक्तीची जाण नसणाऱ्या अज्ञानी कर्मचाऱ्यांनी गाभाऱ्यातच विठ्ठल जोशीला अंघोळ घातली यामुळे समस्त वारकरी सांप्रदाया च्या मनाला वेदना होतील अशी अक्षम्य चुक केली असल्याचे मत संतोष माने यांनी व्यक्त केले आहे.पांडुरंगाच्या गाभाऱ्यात अंघोळ करणाऱ्या विठ्ठल जोशी यांस तसेच त्याला अंघोळ घालणाऱ्या कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबीत करावे अशी मागणी माने यांनी केली आहे. तसेच जर त्यांच्यावर कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संतोष माने यांनी दिला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button