जळगाव जिल्ह्याचा पदभार स्विकारल्यानंतर प्रथमच जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी चाळीसगाव येथे भेट दिली.
प्रतिनिधी नितिन माळे
यावेळी त्यांचे तालुक्याच्या वतीने आमदार मंगेश चव्हाण यांनी स्वागत केले. नूतन जिल्हाधिकारी महोदयांचा दौरा आश्वासक असून लोकप्रतिनिधी म्हणून तालुक्यातील कोरोना स्थिती संदर्भात त्यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली.
यावेळी उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसिलदार अमोल मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. देवराम लांडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.पी.बाविस्कर, शहर पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, पंचायत समितीचे गटनेते संजय पाटील, अमोल चव्हाण, चेतन पाटील आदी उपस्थित होते.
सुरुवातीची अनेक महिने चाळीसगाव तालुका कोरोना पासून दूर होता मात्र लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर रुग्णांची संख्या देखील वाढायला लागली आहे. संशयित रुग्णांच्या स्वँब अहवाल उशिरा येत असल्याने अनेक अडचणींचा सामोरे जावे लागत असल्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी जिल्हाधिकारी महोदयांच्या निर्दशनास आणून दिले. त्यावर जिल्हाधिकारी यांनी स्वँबची संख्या वाढविली असून ज्यांना लक्षणे नाहीत व ज्यांना गंभीर लक्षणे आहेत अशी विभागणी करुन गंभीर रुग्णांसाठी तातडीच्या उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे सांगितले.
आरोग्य व शहर पोलीस यंत्रणेतील अपूर्ण मनुष्यबळ बाबत मागेच पत्रव्यवहार करून अवगत केल्याचे जिल्हाधिकारी आमदार चव्हाण यांनी लक्षात आणून दिले तसेच चाळीसगाव तालुका पुन्हा एकदा शून्य रुग्णसंख्येवर आणण्यासाठी प्रशासनाच्या सोबत असल्याच्या विश्वास जिल्हाधिकारी यांना दिला.
आमदार मंगेश चव्हाण यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून एक अत्याधुनिक रुग्णवाहिका, एक शववाहिका, ५० बेडस ला पुरेल अशी ऑक्सिजन यंत्रणा, डिजिटल एक्सरे मशीन साठी पत्र दिलेले असून जिल्हाधिकारी यांनी त्यावर तात्काळ कार्यवाही करावी अशी विनंती त्यांना केली तसेच माझ्या स्वखर्चाने जलशुद्धीकरण यंत्रणा कोविड सेंटर ला बसवित असल्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले.






