आठपोलिसांची हत्या करणाऱ्या विकास दुबेला घेऊन जाणाऱ्या एसटीएफच्या ताफ्याच्या गाडीचा अपघात झाला. मध्य प्रदेशातून अटक केलेला गँगस्टर विकास दुबेला घेऊन हा ताफा जात होता.
प्रतिनिधी नूरखान
ही घटना बर्रा पोलिस स्टेशन परिसरात घडली आहे. या अपघातादरम्यान कार उलटी झाली. दरम्यान पोलिसांनी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या विकास दुबेचा एन्काऊंटर केला.
दुर्घटनेचा फायदा घेऊन जखमी झालेला विकास दुबे एसटीएफ पोलिसांची पिस्तूल हिसकावून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. पथकातील एका पोलीसाने विकास दुबेवर गोळीबार केला.
सूत्रांनी दिेलेल्या माहितीनुसार विकास दुबे एन्काउंटरदरम्यान गंभीर जखमी झाला होता. विकास दुबेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते,मात्र तो पर्यंत त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.