Maharashtra

पंढरपूरात रॅपिड एंटीजन टेस्ट सुरू करण्यातबाबत नगरसेवक विक्रम शिरसट यांचे प्रांताधिकारी यांना निवेदन

पंढरपूरात रॅपिड एंटीजन टेस्ट सुरू करण्यातबाबत नगरसेवक विक्रम शिरसट यांचे प्रांताधिकारी यांना निवेदन

प्रतिनिधी रफीक आत्तार

पंढरपूर शहरात व ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात वाढत आहे. संशयीत व्यक्‍तीचा स्वॅब घेतल्यानंतर त्याचा रिपोर्ट येण्यास एक ते दोन दिवसांचा अवधी लागत आहे. यामुळे पंढरपूरात कोरोनाची तपासणी करण्यासाठी रॅपिड एंटीजन टेस्ट सुरू करावी अशा मागणीचे निवेदन नगरसेवक विक्रम शिरसट यांनी प्रांताधिकारी सचिन ढोले यांना दिले आहे.पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असून दि. 28 जून ते 8 जुलै या दरम्यान कोरोना बाधितांची संख्या 31 झाली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासन युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. एखादी व्यक्‍तीस कोरोना या रोगाची लक्षणे दिसू लागल्यास त्याचा स्वॅब घेतल्यानंतर कोरोचा अहवाल येण्यासाठी एक ते दोन दिवसांचा अवधी लागत आहे. त्यामुले कोरोनाची साखळी वाढत जात आहे. कोरोनाची साखळी तोडण्याच्या दृष्टीने पंढरपूरातच कोविड 19 रॅपिड अ‍ॅटीजन टेस्ट सुरू करण्यात यावी. या टेस्टमुळे अर्ध्या तासातच कोरोनाचा ची लागण झाली आहे का नाही ही माहिती मिळणार आहे. त्यामुळे कोरोनाची बाधा झालेल्या व्यक्तीचे समजून येणार असून त्याचे झटपट अलगीकरण करून लवकरात लवकरच औषधोपचार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यास मोठी मदत होणार आहे. सोलापुरात येथे 8 जुलैपासून कोविड 19 रॅपिड अ‍ॅटीजन टेस्ट ही तपासणी चालू करण्यात आलेली आहे. त्याच धर्तीवर पंढरपुरातला प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंढरपुरात सुद्धा लवकरात लवकर ही तपासणी सुरू करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी महेश साठे, नगरसेवक डि. राज सर्वगोडे, प्रशांत लोंढे आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button