मनमाड् येथे प्रहार तर्फे खर्या मानकर्यांना समाजरक्षक कोविड योध्दा प्रमाणपत्रकाचे वाटप,
नाशिक जिल्हा प्रतिनिधी शांताराम दुनबळे
नाशिकं-:अपगांचे दैवत प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राज्यमंत्री माननिय बच्चुभाऊ कडु यांच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त मनमाड येथिल गुरूद्वाराचे प्रबंधक बाबा रणजितसिंग यांच्या हस्ते केक कापुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला.त्याच प्रमाणे शिवांजली अपंग बहुउद्देशीय कल्याणकारी सेवाभावी संस्था व प्रहार अपंग क्रांती आंदोलन यांच्या वतिने लॉकडाऊनच्या काळात गुरूद्वारा ट्रस्ट तर्फे मनमाड व परिसरात गोरगरीब जनतेला दोन वेळेचे मोफत जेवण पुरवून जनतेची सेवा केली त्या बद्दल बाबा रणजितसिंग यांना समाजरक्ष कोविड योध्दा 2020 प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
त्याच प्रमाणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनमाड शहरातील पोलिसांनी आपल्या जिवाची बाजी लावून रस्त्यावर उतरुन चोख बंदोबस्त ठेवत कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी जनतेची रात्रंदिवस सेवा केली या बद्दल पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र कुटे साहेब व सर्व पोलिस कर्मचारी यांना समाजरक्षक कोविड योध्दा २०२० प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
उपजिल्हा रुग्णालय येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ.नरवणे यांना व डॉक्टर,नर्स,वार्ङबाॅय व इतर कर्मचारी यांना समाजरक्षक कोविड योध्दा २०२०प्रमाणपत्र बहाल करण्यात आले.
तसेच मनमाड नगर परिषद येथिल मुख्याधिकारी डॉ दिलिप मेनकर यांच्या सह सर्व विशेष अधिकारी,आरोग्य विभाग, सफाई कर्मचारी,अग्निशमन दल यांनी लॉकडाऊनच्या काळात खर्या अर्थाने कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी शहरात उल्लैखनिय कामगिरी केली त्या बद्दल मुख्याधिकारी डॉ दिलिप मेनकर व कर्मचारी यांना समाजरक्षक कोविड योध्दा २०२० प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष हिरामण मनोहर, सचिव सुरेश गांगुर्डे,प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे शहर अध्यक्ष जाफर शहा, तालुका अध्यक्ष अनिस शेख संगिता सांगळे, सारिका पगारे उपेंद्र पाल, धर्मेंद्र धिंगाण,अफरोज आतार,आदी प्रहार सैनिकांनी परिश्रम घेतले.






