अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्तपोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी केली नियमांचे उल्लंघन करणा-या ९७ जणांवर कायदेशीर कारवाईप्रतिनिधी नूरखानअमळनेर – शहर व तालुक्यात सातत्याने वाढणा-या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर अमळनेर शहरात आज दि. ७ जुलै पासून ते १३ जुलै पर्यंत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. आज पहिल्याच दिवशी अमळनेर शहर पूर्णपणे बंद होते.
अमळनेर प्रमाणेच जिल्ह्यातील जळगाव महापालिका क्षेत्र व भुसावळ शहर या ठिकाणीही लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे. पण अमळनेर येथे रूग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यावर उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे.अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंदआज शहरात दुध विक्री,मेडिकल्स व कृषी संबंधित दुकाने सुरू होती. किराणा व भाजीपाला विक्री बंद असल्याने नागरिकांची रस्त्यावरील गर्दी अतिशय कमी होती. अत्यावश्यक काम असल्याशिवाय कुणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाने केले होते. तसेच विनाकारण फिरणा-यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला होता. त्याचाही परिणाम दिसून आला.रस्ते निर्मनुष्य-चौकात पोलीस बंदोबस्तशहरातील दैनंदिन भाजी बाजार, सर्व प्रमुख मार्गावरील दुकाने,शॉपिंग सेंटर हे अतिशय गर्दीचे ठिकाण निर्मनुष्य दिसून आले. प्रमुख रस्त्यावर व चौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
विनाकारण फिरणा-यांवर कायदेशीर कारवाईआज लॉकडाऊनच्या अनुषंगाने शहरात विनाकारण फिरणा-या लोकांवर ९७ केसेस व ३५ हजार रुपये दंड आकारण्यात आला. यात विनापरवाना गावात फिरणे, बिना मास्क घराबाहेर निघणे अशा प्रकारच्या गुन्ह्यात कारवाई करण्यात आली. अप्पर पोलीस अधिक्षक सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंबादास मोरे व त्यांचे पथकातील सपोनि प्रकाश सदगिर, सपोनि एकनाथ ढोबळे, पोउनि गणेश सूर्यवंशी व राहुल लबडे तसेच कर्मचारी पो.ना. डॉ.शरद पाटील, पो.हे.कॉ. संजय पाटील,पो.ना. दिपक माळी, रवी पाटील, हितेश चिंचोरे, ललित पाटील, अमळनेर बस डेपोचे ड्रायव्हर किरण धनगर यांनी कारवाई केली.लॉकडाऊनचे नियम पाळावेत आवाहनअमळनेर शहरात प्रशासनाने जनतेच्या हितासाठीच लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. शहर व तालुक्यातील नागरिकांनी या कालावधीत नियमांचे पालन करावे. शासन व प्रशासन कोरोना आजारावर मात करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे. नागरिकांनी कोरोना सारख्या आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन किमान आपल्या व आपल्या परिवाराच्या आरोग्यासाठी नियमांचे पालन करावे असे आवाहन अमळनेर हेडलाइन्सच्या वतीने करण्यात येत आहे.






