Maharashtra

अकलूज येथे एकता बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने कोवीड योध्दा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला

अकलूज येथे एकता बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने कोवीड योध्दा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला

प्रतिनिधी रफिक आतार

कोरोना संसर्गाच्या काळात सक्षमपणे कर्तव्य बजावल्याबद्दल अकलूज येथील एकता बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने ‘कोवीड योद्धा ‘ हा पुरस्कार माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते – पाटील यांच्या हस्ते प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आला. माळशिरसचे तहसीलदार अभिजीत पाटील, गटविकास अधिकारी स्मिता पाटील, पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रामचंद्र मोहिते,अकलूजच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुप्रिया खडतरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रेनिक शहा,डॉ. संकल्प जाधव, ग्रामविकास अधिकारी सुधाकर मुंगूसकर,चंद्रकांत भोसले, बाळासाहेब वाईकर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी एकता संस्थेचे प्रमुख जावेदबाबा तांबोळी, हाजी आदमभाई तांबोळी,रशीद मुलाणी, हमीद मुलाणी आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button