Maharashtra

ठाकरे सरकारने राज्यातील अंगणवाङी सेविका आणी आशा कामगार यांच्या मागण्या तात्काळ मंजूर कराव्यात

ठाकरे सरकारने राज्यातील अंगणवाङी सेविका आणी आशा कामगार यांच्या मागण्या तात्काळ मंजूर कराव्यात

तथ्य योद्धा महाराष्ट्र कामगार आघाङीचे अध्यक्ष योगीराज वांद्रे यांची मागणी

कोल्हापूर आनिल पाटील

राज्यातील ठाकरे सरकारने अंगणवाङी सेविका आणी आशा कामगार यांच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात अशी मागणी तथ्य योद्धा महाराष्ट्र कामगार आघाङीचे अध्यक्ष योगीराज वांद्रे यांनी मूख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकङे निवेदनाद्वारे केली आहे.

महाराष्ट्र राज्यातून विविध ठिकाणाहून अंगणवाडी सेविका आणि आशा कामगार” यांच्याकडून जीवनावश्यक मागण्या शासनाकङे ठेवल्या आहेत .त्या मागण्यांचा वेळोवेळी पुरेपूर तगादा देखील लावला जात आहे पण अद्याप त्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत.

आशा कामगार आणि अंगणवाडी सेविका यांचे मासिक वेतन अतिशय तुटपुंज आहे. त्यांना जास्त वेळ काम करून अगदी २०००/- मात्र पासून पुढे जास्तीतजास्त ७०००/- मात्र मासिक वेतन दिल जात आहे. इतक्या कमी पगारामध्ये त्यांच्या अन्न, वस्त्र, निवारा आणि मुलांच शिक्षण या मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीत. त्यामुळे हे लक्षात घेण्यासारखं आहे कि यांच्या मागण्या एखादा शौक किंवा मोठया इच्छा पूर्ण करण्यासाठी नाहीत तर अन्न, वस्त्र, निवारा आणि मुलांच शिक्षण या मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्यात या करिता आहेत. तेव्हा कृपया आपण जाणीवपूर्वक लक्ष देऊन, अंगणवाङी सेविका व आशा कामगार यांच्या मागण्या तात्काळ मंजूर कराव्यात असे ही या निवेदनात म्हणटले आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button