Maharashtra

अमळनेर नगरपरिषद हद्दीतील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या

अमळनेर नगरपरिषद हद्दीतील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या

प्रतिनिधी नूरखान

लुल्ला मार्केट व सानेगुरुजी मार्केट मधील असलेली नाला-कम गटार अंदाजित
400 फुट लांब 6 फुट रुंद व 5 फुट खोलीची असलेल्या गटारीमध्ये गंगाघाट
परिसर, न्युप्लॉट परिसर, मिा गल्ली परिसर या मोठया क्षेत्रातून आलेल्या गटारी
मोठया गटारीस मिळलेली आहे. परंतु सदरची नाला – कम गटारीचा गाळ 20 ते
22 वर्षापासून काढलेला नसल्या कारणाने पावसाळयातील दिवसात पाऊस
आल्यास गंगाघाट व भाजीमार्केट परिसरात रस्त्यावर 3 ते 4 फुट इतके पाणी
साचून व्यापारांच्या दुकानात पाणी शिरुन आर्थिक नुकसान होवून नागरीकांचे
आरोग्य देखील धोक्यात येत होते.

तरी सदर प्रकरणी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील
यांनी या भागाची नगरसेवक, मुख्याधिकारी, बांधकाम अभियंता व
आरोग्यविभागाचे अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करुन पाण्याचा निचरा होणेकामी
झालेली अतिक्रमण काढून गाळ काढण्याचे काम व गटारीचा मार्ग सरळ
करण्याबाबत नगरपरिषदेस सुचविले त्यानुसार जिजामाता कृषिभूषण
सौ.पुष्पलता साहेबराव पाटील लोकनियुक्त नगराध्यक्षा यांच्या आदेशावरुन
कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांनी सदर कामाचे तातडीने
आदेश दिले असून सदर गटारीतून आजतागायत 150 ट्रक्टर गाळ व साधारणत:
8 ट्रक्टर झाडे – झुडपे काढलेली आहेत. व सदर गटारीस मिळणाऱ्या
उप-गटारीचा मार्ग हा वळणदार असल्याने पाण्याचा निचरा सहजरित्या
होणेकामी विजय मेडिकल पासून उत्तरेस भूमीगत गटार टाकण्याचे काम देखत
हाती घेण्यात आलेले आहे. तरी या बाबत सदर कामाबाबत व्यापारी व
नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे सदर कामाची पाहणी करतांना
मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button