युवा गुर्जर महासभा शाखा अध्यक्षपदी रमाकांत महाजन तर उपाध्यक्षपदी जयंत पाटील
प्रतिनिधी मुबारक तडवी
मोठा वाघोदा येथे युवा गुर्जर महासभेची शाखा कार्यकारणी गठीत् करण्यात आली
युवा गुर्जर महासभेच्या वाघोदा शाखेची कार्यकारिणी घोषित करण्यात आली असून महासभेचे प्रदेश अध्यक्ष विजय पाटील, प्रदेश संपर्कप्रमुख राकेश पाटील, जिल्हाध्यक्ष श्रीराम पाटील व प्रदेश सचिव तुषार पाटील यांनी शाखा कार्यकारिणी जाहीर केली मोठा वाघोदा युवा गुर्जर शाखाध्यक्ष पदी रमाकांत महाजन, उपाध्यक्षपदी जयंत पाटील, चिटणीस गोकुळ चौधरी व सचिव पदी राहुल पाटील यांची निवड करण्यात आलेली आहे. विजय पाटील यांनी ऑनलाइन पद्धतीने नियुक्त पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना समाजातील तरुणांना बेरोजगारी, उद्योग व शिक्षण या विषयांवर प्रोत्साहित करून त्यांना सहकार्य व मार्गदर्शन करावे तसेच याच विषयांना प्राधान्य देऊन कार्य करण्याच्या सूचना देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.






