Mumbai

आखाडा विधानसभेचा… माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला आमदार पदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडून मंजूर… राजकीय खेळी की बचाव चर्चेला उधाण…

आखाडा विधानसभेचा…
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला  आमदार पदाचा  राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडून मंजूर…
राजकीय खेळी की बचाव चर्चेला उधाण…तोंडाने फतकळ असलेले अजित पवार दोन दिवस शांत?????

आखाडा विधानसभेचा... माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला आमदार पदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडून मंजूर... राजकीय खेळी की बचाव चर्चेला उधाण...

मुंबई 
  राज्य सहकारी बँकेतील कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी अजित पवार आणि सहकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणात  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही ते  बँकेच्या संचालक पदावर नसताना  सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि ईडी यांच्यात जबरदस्त तेढ निर्माण झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेचे पडसाद उमटले आहेत. परंतु गेल्या दोन दिवसांत नेहमी टचकन बोलणारे अजित पवार मात्र एकही शब्द बोलले नाहीत.
आज दिवसभर रंगलेल्या  ईडी माघार नाटक आणि  अचानक अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली  आहे. 
आजही अजित पवार हे पुणे येथे होते  आज शरद पवार यांच्या ईडीविरोधातील वादळात  कुठेही  दिसून आले नाहीत. 
 दरम्यान अजित पवार यांचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडूनही मंजूर करण्यात आला आहे. कारण समजू शकले नाही.राजीनामा देण्यासाठी अजित पवार विधानसभाध्यक्षांच्या दालनात गेले होते. मात्र, विधानसभाध्यक्षांच्या विधिमंडळ कार्यालयात तहरिभाऊ बागडे उपस्थित नसल्याने त्यांच्या पीएकडे  ल राजीनामा दिला. तसेच बागडेंना फोन करून याची माहीती दिली. यानंतर बागडेंनी सायंकाळी 5.40 मिनिटांनी हा राजीनामा मंजूर केला आहे.
शरद पवार आज मुंबईमधील ईडीच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांशी समक्ष चर्चा करणार होते. मात्र पवारांनी घराबाहेर पडू नये कायदा सुव्यवस्था कोलमडू शकते  अशी विनंती पोलिसांनी केल्या नंतर आणि परिस्थितीचे भान ठेवले व ईडी कार्यालयात जाणे रद्द केले. मात्र पुण्यात पावसाच्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या नुकसानाची पाहणा करण्यासाठी तात्काळ पुण्याला रवाना होत असल्याचे शरद पवारांनी ट्विट करत सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button