Amalner

अमळनेर ग्रामीण काँग्रेस कमेटी तरफे पेट्रोल डिझेलचे वाढते दर कमी करावे त्याबाबत नयाब तहसीलदार यांना निवेदन

प्रतिनिधी नूरखान

अमळनेर ग्रामीण काँग्रेस कमेटी तरफे पेट्रोल डिझेलचे वाढते दर कमी करावे त्याबाबत नयाब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले

जग सद्या कोरोनाच्या महामारीने त्रस्त आहे. या संकटाने लाखो लोकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. उद्योगधंदे अजुनही पुर्वपदावर आलेले नाहीत. बहुसंख्य जनता जगण्यासाठी धडपड करीत आहे. अशा कठीण प्रसंगी पेट्रोल-डिझेलच्या महागाईने आणखी एक संकट लोकांवर ओढवले आहे.
नुकतेच लिटर ९.१२ रूपये तर डिझेलमध्ये ११.०१ रूपयाची वाढ करण्यात आलेली आहे. देशभरात पेट्रोलच्या किंमती प्रति लिटर ८७-८८ रूपयांच्या पुढे गेल्या आहेत. तर दिल्लीमध्ये डिझेल पेट्रोलपेक्षा जास्त महाग आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर निच्चांकी पातळीवर असतांना त्याचा थेट फायदा सामान्य जनतेला दिला जात नाही. वास्तविक पहाता आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीचा विचार करून देशांतर्गत इंधनाचे दर ठरवले जात असतांना सध्या ती पारदर्शकता राहीलेली नाही. २०१४ मध्ये पेट्रोलवर उत्पादन शुल्क हे ९.४० रूपये तर डिझेलवर ३.५६ रूपये होते.सद्या हेच शुल्क पेट्रोल ३२.९८ रूपये तर डिझेल ३१.८३ रूपये असे आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमती पाहता पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी करून सामान्य जनतेला त्याचा लाभ देणे सहज शक्य आहे. सर्वसामान्य जनता दुहेरी संकटात असतांना आपण या प्रश्नी सदरहु निवेदन
हे. मा.भारताचे राष्ट्रपती, नवी दिल्ली यांच्याकडे सादर करावे. ही विनंती.
निवेदन देण्यात वेळी जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ,नगरसेवक मनोज पाटिल अधिक संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button