Maharashtra

सबगव्हाण गावात सर्रास गावठी दारू विक्री विक्रेत्यांनी केले कहर ग्रामपंचायतला लागली झोप प्रशासन करणार का कार्यवाही

सबगव्हाण गावात सर्रास गावठी दारू विक्री विक्रेत्यांनी केले कहर
ग्रामपंचायतला लागली झोप
प्रशासन करणार का कार्यवाही

रजनीकांत पाटील

अमळनेर : ता.सबगव्हाण
देशभरात कोरोना सारख्या आजाराने थैमान घातले असता अशा बिकट परिस्थितीत नागरिक आपला जीव मुठीत धरून काबाळ कष्ट करत आरोग्य धोक्यात घालून जीवन जगत आहेत गरीब जनतेला अन्नधान्य मिळावं या साठी काही शासन उपायोजन करत आहे. काही सामाजिक कार्यकर्ते तरुण पिढी लोकांना अन्न घसरपोच मिळावं या साठी हेलपाट करत
आहे अशा बिकट परिस्थितीत देखील काही लोक तर वेगळाच फायदा घेत लूट करत खिसा भरत आहे तालुक्यातील सबगव्हान परिसरात गावठी हातभट्टी दारू मोकाट विकली जात असून विक्रेत्यानी चंगलाच कहर केले असून गावात नागरिकांना व्यसनाधीन करत नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालवत आहे.
सबगव्हाण परिसरात अध्यापही दारू बंद होण्याचे काही नावच नाही. हातभट्टी दारू पडणाऱऱ्यांना कोणाची भीती नसून रोज दारू तयार करण्याचे काम सुरू ठेवतात
गावातील पोलीस पाटील सरपंच ग्रामपंचायत यांनी चांगलीच बघाची भूमीका घेतली असून दारू विक्रेत्यानंवर कुठलीही कार्यवाही नाही या बाबत काहीतरी गोलमाल तर नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे या बाबतची व्यथा गावातील तरुण योगेश सुभाष पाटील,गोकुळ मका पाटील,बळीराम नामदेव पाटील,प्रवीण जगदीश पाटील,दत्तू महादू पंचाळ यांनी ‘ठोस प्रहार’शी बोलतांना सांगितले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button