Maharashtra

इंदापूर शहरामध्ये पाच आणि तालुक्यातील ग्रामीण भागात आठ कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह इंदापूर तालुक्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये प्रशासनाचे आव्हान पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

इंदापूर शहरामध्ये पाच आणि तालुक्यातील ग्रामीण भागात आठ कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह इंदापूर तालुक्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये प्रशासनाचे आव्हान

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे- इंदापूर तालुक्यातील काल जे जंक्शन, शेळगाव आणि इंदापूर शहरामध्ये प्रत्येकी एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते. इंदापूर तालुक्यातील ह्या तीन रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ३७ लोकांचे नमुने घेऊन तपासणीसाठी दिले होते त्या नमुन्याचा रिपोर्ट आल्यानंतर इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात आठ(८) आणि शहरी पाच(५)भागात असे एकुण तेरा (१३)रुग्ण एकाच दिवशी कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत अशी माहिती इंदापूर तालुक्याचे तहसीलदार सोनाली मेटकरी, इंदापूर उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉक्टर चंदनशिवे, गट विकास अधिकारी विजयकुमार परीट, इंदापूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुरेखा पोळ यांनी दिली आहे.

जे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामध्ये शेळगाव मधील एक रुग्ण, जंक्शन येथील एक रुग्ण, आणि इंदापूर शहरातील एक रुग्ण यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची कोरोना टेस्ट केल्यानंतर संपर्कात आलेल्या नागरिकांच्या संपर्कातील जंक्शन येथील रुग्ण ३ , शेळगाव येथील संपर्कातील ५ आणि इंदापूर रुग्णाच्या संपर्कातील ५ असे तेरा(१३) कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
तरी इंदापूर तालुक्यातील व शहरातील आणि ग्रामीण भागातील लोकांनी, नागरिकांनी घाबरून न जाता सुरक्षित राहा, घरीचं राहा, सोशल डिस्टन्स पालन करा कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असे आव्हान इंदापूर तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button