कळंबच्या उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ स्वतः बाजारपेठेत,कार्यवाही ला सुरुवात
प्रतिनिधी:-सलमान मुल्ला
महाराष्ट्रात कोरोना ने धुमाकूळ घातला असून सध्या महाराष्ट्रात लोक डाऊन सुरू आहे.मात्र काही उनाड टप्पू लोक काही कारण नसताना विनाकारण हिंडत असल्याचे चित्र कळंब तालुक्यात जागोजागी पाहायला मिळत आहे.
प्रशासनाकडून वेळोवेळी आवाहन करून,कार्यवाही करून देखील हे विनाकारण फिरणारे लोक आटोक्यात येत नसल्याचे दिसून आल्यानंतर कळंब च्या उपविभागीय अधिकारी अधिकारी अहिल्या गाठाळ,नायब तहसिलदार अस्लम जमादार यांनी स्वतः जातीने वैयक्तिक लक्ष घालून याप्रकरणी कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे.
आज कळंब शहरांमध्ये करांच्या उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ व नायब तहसिलदार अस्लम जमादार यांनी स्वतः छत्रपती शिवाजी चौक,होळकर चौक तसेच अन्य मुख्य रस्त्यामध्ये व बाजारपेठ येथे थांबून सायंकाळी 5 वाजता च्या पुढे दुकाने सुरू ठेवणाऱ्या,मास्क न वापरणाऱ्या,सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्या किंवा दुचाकीवरून विनाकारण हिंडणाऱ्या व्यक्तीविरोधात कारवाईचा बडगा उभारला आहे.
असे कर्तव्यदक्ष अधिकारी आपले काम जबाबदारी ने करत आहेत मात्र नागरिकांनी ही सहकार्य करायला हवे.
खरंच अहिल्या गाठाळ व अस्लम जमादार यांचे काम प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे.






