Maharashtra

चांदवडच्या परिक्षार्थींचे आमदारांद्वारे मुख्यमंत्र्यांना निवेदन

चांदवडच्या परिक्षार्थींचे आमदारांद्वारे मुख्यमंत्र्यांना निवेदन

प्रतिनिधी उदय वायकोळे

चांदवड शहर व ग्रामीण भागातील अनेक मुले सरळसेवा,पोलीस भरतीसाठी अभ्यास करीत आहेत. फडणवीस सरकारच्या काळात जानेवारी 2019 ते मार्च 2019 पर्यंत महापोर्टल या शासकीय भरतीच्या पोर्टलवर विद्यार्थ्यांनी जि प,पोलीस विभाग,आरोग्य विभाग,पशुसंवर्धन विभाग,MIDC अश्या विभागांच्या भरतीसाठी फॉर्म भरलेले होते.दीड वर्ष उलटून गेले तरी परीक्षा होत नसल्याने परीक्षार्थी चिंताग्रस्त झालेले असून त्यांना मानसिक त्रासास सामोरे जावे लागत आहे. तरी त्या भरतीबाबत वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी विद्यार्थी करीत आहेत. तसेच काही उमेदवार पोलीस भरती 2018 ला प्रतीक्षा यादीत आहेत त्यांना सध्याच्या कोविड परिस्थितीत सेवेची संधी मिळावी अशी मागणी केलेली आहे.काही दिवसांपूर्वी शासनाने फक्त आरोग्य ,अन्न औषध प्रशासनात भरती केली जाईल असा निर्णय घेतल्याने जिल्हा परिषद आरोग्य विभाग व महाराष्ट्र शासन आरोग्य सेवक भरती तरी लवकर व्हावी अशी मागणी परीक्षार्थी करीत आहेत. परीक्षार्थींना आज आमदार डॉ राहुल आहेर चांदवड येथे आल्याचे समजताच त्यांनी आमदार साहेबांची भेट घेऊन व्यथा मांडली,आमदारांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री साहेबांकडे पत्रव्यवहार केल्याचे समजते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button