Amalner

? ठोस प्रहार ब्रेकिंग..अमळनेर कोव्हीड केअर सेंटर मधील लोक गावात फिरून येतात?प्रशासन झोपा काढते का? …पॉझिटिव्ह आणि कोरेन्टाईन रुग्णांनी केल्या तक्रारी

? ठोस प्रहार ब्रेकिंग..अमळनेर कोव्हीड केअर सेंटर येथे अस्वच्छता आणि डासांचे साम्राज्य…पॉझिटिव्ह आणि कोरेन्टाईन रुग्णांनी केल्या तक्रारीप्रा जयश्री दाभाडेअमळनेर येथे कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोव्हीड केअर सेंटर ची निर्मिती करण्यात आली आहे. हे केंद्र सध्या प्रताप महाविद्यालयाच्या प्रांगणात असून येथे काल दि 1 जुलै 2020 रोजी 36 पॉझिटिव्ह रुग्ण आणि 72 कोरेन्टाईन संशयित रुग्ण दाखल आहेत.ठोस प्रहारच्या टीम ने या रुग्णांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. या संवादातून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. यातील प्रमुख बाबी म्हणजे येथील स्वच्छता गृहांची साफ सफाई नियमितपणे होत नसल्याची तक्रार केली आहे. तसेच या परिसरात डासांचे प्रमाण खूप जास्त आहे आणि सध्या पावसाळ्याचे दिवस असून डासांचे प्रमाण त्यामुळे वाढले आहे.यातून पुन्हा साथीचे रोग पसरू शकतात.त्यामुळे ह्या संपूर्ण भागात डास प्रतिबंधक फवारणी होणे आवश्यक आहे.अशी मागणी येथील दाखल रुग्णांनी केली आहे.याशिवाय संशयित रुग्ण येऊन 3 ते 4 दिवस होऊन जातात तरी स्वब घेतले जात नाहीत.अशी देखील तक्रार करण्यात आली आहे. ठोस प्रहारची टीम जेंव्हा येथे पोहचली तेंव्हा एकही पोलीस,सुरक्षा कर्मचारी उपस्थित नव्हते.येथील उपयोगात आणलेले हँड ग्लोव्हज व इतर बायोमेट्रिक वेस्टज कोव्हीड केअर सेंटर च्या फलकाच्या खाली एका बादलीत उघड्यावर पडलेला आढळून आला.? ठोस प्रहार ब्रेकिंग..अमळनेर कोव्हीड केअर सेंटर मधील लोक गावात फिरून येतात?प्रशासन झोपा काढते का? ...पॉझिटिव्ह आणि कोरेन्टाईन रुग्णांनी केल्या तक्रारीयाशिवाय येथील एका कोरेन्टाईन महिला रुग्णाने पळून जाण्याचा प्रयत्न देखील केला होता. तसेच एका महिला पॉझिटिव्ह रुग्णाजवळ एक निगेटिव्ह व्यक्ती राहत असून ही व्यक्ती संपूर्ण गावात फिरून देखील येते अशी धक्कादायक माहिती देखील मिळाली आहे. हा सर्व प्रकार कोरोना च्या वाढत्या प्रादुभावाच्या पार्श्वभूमीवर अत्यन्त धक्कादायक असून यातून अमळनेर शहराला मृत्यूच्या दाढेत धकल्याण्याचा प्रकार प्रशासन करत आहे असे निदर्शनास येते आहे. आतापर्यंत प्रशासनाच्या चुकांमुळे च तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली असून अजूनही वाढतच आहे आणि बेजबाबदार प्रशासन मात्र डोळे झाकून होणाऱ्या प्रकारांवर ,जनतेवर नियंत्रण मिळविण्यात अयशस्वी झाले आहे.कोव्हीड केअर सेंटर मधील साधारण कर्मचारी वर्ग अत्यन्त चांगले कार्य करत असल्याची माहिती येथील रुग्णांनी दिली आहे. पाणी पुरवठयाचे सुभाष सोनवणे,गणेश शिंगारे, परिचारिका यांच्या उत्तम सहकार्य, मदत ,प्रेरणा रुग्णांना मिळत असल्याचे रुग्णांनी सांगितले आहे.ठोस प्रहारच्या टीम ने येथील रुग्णांशी मनमोकळा संवाद साधला तसेच कोणीही पॅनिक होऊ नये, घाबरून जाऊ नये, काहीही अडचण असल्यास त्वरित संपर्क साधावा, मनोधैर्य चांगले असेल तर कोरोना हा अत्यन्त क्षुल्लक आजार आहे, आपल्या कडे कोरोना चा मृत्यू दर कमी आहे असे समुपदेशन देखील ठोस प्रहारच्या टीम ने रुग्णांचे केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button