Maharashtra

वरणगाव शहरात विकासाची कामे अफाट माजी नगराध्यक्ष सुनील काळे* डीपीडिसी अंतर्गत वरणगाव शहरात 8 सौरऊर्जेच्या लाईट लावण्याच्याकामाचे भूमिपूजन संपन्न

वरणगाव शहरात विकासाची कामे अफाट माजी नगराध्यक्ष सुनील काळे*
डीपीडिसी अंतर्गत वरणगाव शहरात 8 सौरऊर्जेच्या लाईट लावण्याच्याकामाचे भूमिपूजन संपन्न

प्रतिनिधी जितेंद्र गायकवाड

वरणगाव दि.१ जुलै,:-शहरात नागरिकांची वर्दळ ज्या ठिकाणी असते अश्या 8 ठिकाणी जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून तत्कालीन पालकमंत्री आ गिरीशभाऊ महाजन यांच्या आदेशानुसार जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून डीपीडिसी सदस्य सुनील काळे यांनी वरणगाव शहरात पोलीस स्टेशन , बसस्टँड चौक हनुमान व्यायाम शाळा समशान भूमी जुने गाव कबरस्थान सिद्देशवरनगर समशान भूमी यासह 8 ठिकाणी सौरऊर्जा वरचे स्वयंचलीत लाईट बसवण्याचे भूमीपूजन आज डीपीडिसी सदस्य तथा माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या प्रमुख उपस्तिथ पोलीस निरीक्षक संदीप कुमार बोरसे मुख्यधिकारी श्री शामकुमार गोसावी मा उपनगराध्यक्ष शेख आखलाक यांच्या शुभहस्ते भूमिपूजन संपन्न झाले यावेळी कामगार नेते मिलिंद भाऊ मेढे कमलाकर मराठे हितेश चौधरी संजय सोनार शंकर पवार किशोर सोनार शामराव धनगर यांची उपस्तिथी होती यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील काळे म्हणाले की डीपीडिसी च्या माध्यमातून तत्कालीन पालकमंत्री आ गिरिषभाऊ महाजन यांनी वरणगाव शहराच्या दृष्टीने महत्वाच्या जागेवर लाईट जरी गेली तरी हे लाईट संध्याकाळी सुरू होऊन सकाळी आपोआप बंद होतील रात्री सुरू होतील अशी यंत्रणा त्यात आहे लवकरच शहरात जेष्ठ नागरिकांसाठी बेंच सुद्धा तात्काळ मुख्यधिकार्यानी प्रोसेस करून जनते साठी मार्ग खुला करण्यात येणार असल्याची माहिती सुनील काळे यांनी दिली

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button