Maharashtra

चांदवडला मास्क न वापरणाऱ्या 42 लोकांवर दंडात्मक कारवाई

चांदवडला मास्क न वापरणाऱ्या 42 लोकांवर दंडात्मक कारवाई

प्रतिनिधी उदय वायकोळे

चांदवड नगरपरिषद व पोलिस प्रशासन यांनी संयुक्तपणे चांदवड शहरात नगरपरिषद कार्यालय ते पेट्रोलपंप चौफुली पर्यंत जे लोक विनामास्क फिरताना दिसले अश्या 42 लोकांवर दंडात्मक कारवाई केली.यावेळी 4200 रु दंड वसूल करण्यात आला.
चांदवड शहराची मुख्य बाजारपेठ परिसरात अचानक अशी धडक मोहीम नगरपरिषद व पोलीस प्रशासनाने सुरू केल्याने विनामास्क फिरणाऱ्या लोकांना आतातरी चाप बसेल का? अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती.चांदवड शहरात आज पुन्हा दोन नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने अतिशय काळजी घेणे शहराच्या दृष्टीने गरजेचे आहे. प्रशासन वारंवार आवाहन करीत असतानासुद्धा नियम धाब्यावर ठेवून नागरिक विनामास्क फिरताना आढळल्याने प्रशासनातर्फे सदर कारवाई करण्यात आली

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button