Nashik

? Big Breaking…नाशिकच्या कारागृहात युसूफ मेमन याचा मृत्यू..मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील दोषी

नाशिकच्या कारागृहात युसूफ मेमन याचा मृत्यू ,मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील दोषी

नाशिक प्रतिनिधी शांताराम दुनबळे

नाशिक-: मुंबईत १ ९९ ३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट घडवून आणल्या प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरविलेल्या आरोपी युसूफ मेमन याचा नाशकातील मध्यवर्ती कारागृहात शुक्रवारी ( दि . २६ ) सकाळी हदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला . याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून , त्याचा मृतदेह धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इन कॅमेरा शवविच्छेदन करून त्याच्या कुटुंबियांकडे सोपविण्यात आला . विशेष म्हणजे , अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक टायगर मेमन याचा सख्खा भाऊ असलेल्या युसूफचा आणखी एक भाऊ इसाक मेमन हा त्याच्याच जवळ कारागृहात शिक्षा भोगत आहे .

मुंबई साखळी बॉम्बस्फोटाच्या तपासात व न्यायालयातील सुनावणीत मुख्य आरोपींमध्ये दाऊदसोबत त्याचा शार्पशूटर टायगर मेमन व त्याचे तीनही भाऊ असे आरोपी निष्पन्न झाले आहे . या आरोपींना न्यायालयाने आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे . २०१८ युसूफ मेमन व त्याचा भाऊ इसाक मेमन नाशिकच्या कारागृहात शिक्षा भोगत होते . यात आरोपी युसूफ हा शुक्रवारी सकाळी कारागृहातील बाथरूममध्ये चक्कर येऊन पडला . त्याला कारागृहाचे अधीक्षक प्रमोद वाघ यांनी कर्मचाऱ्यांसह कारागृहातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल रुग्णालयातील डॉ . कुमावत यांनी प्राथमिक तपासणी करीत जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविले . मात्र , सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास त्याचा उपचारातच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले . सदर घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली . तातडीने बंदोबस्त तैनात करीत सर्व प्रक्रिया पार पडून दुपारी चार वाजेच्या सुमारास युसूफचा मृतदेह शवविच्छेदनासाठी धुळे शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले . याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button