अमळनेर तालुक्यात आज आढळले सहा पॉझिटिव्ह… चाळीस अहवाल आले निगेटीव्ह…
प्रतिनिधी रजनीकांत पाटील
अमळनेर :- तालुक्यात आज आणखी सहा बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तसेच नवीन दोन खेड्यात कोरोना बाधित रुग्ण आढळून आला आहे.
सदर रुग्ण हे जानवे येथील ५७ वर्षीय पुरुष, गडखांब येथील ६७ वर्षीय पुरुष, शिरूड येथील ६५ वर्षीय पुरुष, व ५४ वर्षीय महिला तसेच अमळनेर शहरातील देशमुख नगर ५१ वर्षीय पुरुष, पोलिस लाईन भागातील २८ वर्षीय महिला बाधित असल्याचे आढळून आले आहेत. आज ४५ स्वॅब घेण्यात आले तर ७६ अहवाल प्रतीक्षेत आहेत.






