Maharashtra

फॅबटेक समूहाचे संस्थापक अध्यक्ष यांचे पुण्यस्मरणानिमित्त वृक्षारोपण हा स्तुत्य कार्यक्रम सोमनाथ आवताडे

फॅबटेक समूहाचे संस्थापक अध्यक्ष यांचे पुण्यस्मरणानिमित्त वृक्षारोपण हा स्तुत्य कार्यक्रम सोमनाथ आवताडे

प्रतिनिधी रफीक आत्तार

मंगळवेढा फॅबटेक उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष स्व. बिरासाहेब रुपनर यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस मंगळवेढा मार्केट कमिटीचे सभापती सोमनाथ आवताडे, फॅबटेक शुगर चे मार्गदर्शक भाऊसाहेब रुपनर यांचे हस्ते फोटोचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्या आले.
यावेळी बोलताना सोमनाथ आवताडे म्हणाले की, स्व. बिरासाहेब यांनी गरिबीतून शिक्षण घेऊन एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती हा कशा पद्धतीने उद्योजक होऊ शकते याचे जिवंत उदाहरण आपल्या तरुण पिढीच्या पुढे ठेवून गेले आहेत. यातूनच त्यांची सर्व सामान्य जनते बाबतची तळमळ दिसून येतो. त्यांनी पुण्यासारख्या शहरात जाऊनही आपल्या गावाची ओळख न विसरता आपल्या गावासाठी तालुक्यासाठी जे शक्य तेवढे करण्याच्या प्रयत्नातूनच सांगोला येथे गारमेन्ट, स्पिंनिंग, इंजिनिअरिंग कॉलेज, पब्लिक स्कुल व मंगळवेढा मध्ये साखर कारखाना काढून येथील तरुण पिढीच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न केलेला आहे

तसेच आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त फॅबटेक शुगरने जो वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला तो स्तुत्य असून यापुढे ज्या ज्या वेळी मला कारखान्यावर येण्याचा योग येईल त्या त्यावेळी झाडाकडे पाहून स्व. बिरासाहेब यांनी आयुष्यात केलेल्या कार्याची आठवण येईल व माझ्या जीवनाला स्फूर्ती मिळेल असे उद्गार काढले

यावेळी भाऊसाहेब रुपनर बोलताना म्हणाले की, स्व. बिरासाहेब यांना लहानपणापासून ते वयाच्या 57 व्या वर्षा पर्यंतच्या जीवनाचा साक्षीदार असल्याने त्यांनी त्यांच्या जीवनात उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलेले कष्ट, तळमळ, गरीब जनतेप्रती असणारी आत्मीयता कशी होती, याचा जीवनपट सर्वांसमोर ठेवला शेवटी स्व. बिरासाहेब हे रुपनर कुटुंबियांसाठी हिरा होते. त्यांची अजून रुपनर कुटुंबीयांना व फॅबटेक परिवाराला गरज होती अशी भावना व्यक्त केली.

यावेळी स्पार्कन इंजिनिअरिंगचे संचालक दीपक रुपनर, चेअरमन सरोजभाई काझी, दामाजी शुगरचे संचालक विजय माने, बापू काकेकर, कार्यकारी संचालक मोहन पिसे, शिवनगीचे सरपंच बनी, दादा बाबर, डिस्टिलरी मॅनेजर चेतन काळे, चीफ केमिस्ट मोहन पवार, वित्त अधिकारी रघुनाथ उन्हाळे, ऊस पुरवठा अधिकारी उत्तम ढेरे, मार्केटिंग मॅनेजर अमोल ढवळे, असिस्टंट एचआर मॅनेजर ज्ञानेश्वर बळवंतराव व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

*फोटो ओळी*
स्वर्गीय बिरा साहेब यांच्या स्मृतीस वंदन करताना व वृक्षारोपण करताना सोमनाथ आवताडे, भाऊसाहेब रुपनर, सरोज काझी, दीपक रुपनर, विजय माने, बापू काकेकर, मोहन पिसे…

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button