आटाळे गावात कापूस पिकावरील पोक्रा योजनेअंतर्गत शेतकरी शेतीशाळा संपन्न
प्रतिनिधी रजनीकांत पाटील
अमळनेर :- तालुक्यातील चिमणपुरी पिंपळे परिसरासह आटाळे गावात कृषि विभागाच्या पोक्रा योजनेअंतर्गत शेतकरी सुधाकर पाटील यांच्या शेतात शेती शाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया, जैविक खतांचा वापर, रेफ्युजी बियाणे लागवडीचे महत्त्व, निंबोळी अर्क तयार करणे, कापूस पिकावर येणाऱ्या संभाव्य किडी व रोग आणि एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन या विषयांवर कृषी सहायक प्रवीण आर पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी युरिया खताचा अतिवापर टाळून संतुलित प्रमाणात खतांचा करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी सरपंच कमलबाई पाटील, उपसरपंच प्रकाशसिंग पाटील, गोपीचंद पाटील , धनसिंग पाटील, गोपाल पाटील, सतीश पाटील, भिमराव पाटील, शोभाबाई पाटील, रंजनाबाई पाटील, कल्पना पाटील, बेबाबाई यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. शेतीशाळा यशस्वीतेसाठी कृषिसहाय्यक अमोल कोठावदे, समूह सहायक सतिष लांबोळे व दिनेश बोरसे यांचे सहकार्य लाभत आहे.






