शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये प्रति एकरी अनुदान द्या तसेच पेट्रोल डिझेल दरवाढ व चिनी माल विक्री बंद करा रिपब्लिकन सेनेचे निवेदन
प्रतिनिधी-सलमान मुल्ला
याबाबत सविस्तर माहिती अशी की 2020 मध्ये खरिपाची पेरणी करत असताना शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाचे सोयाबीन मिळाले असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे त्यामुळे त्यांच्यावर कर्जाचा मोठा डोंगर उभा आहे त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना एकरी पंधरा हजार रुपये प्रमाणे अनुदान द्यावे.
बोगस बियाणे बनवणाऱ्या कंपन्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा रिपब्लिकन सेनेच्या वतीने करण्यात आली आहे
तर देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात लोकडाऊन मुळे जनता हवालदिल झाली आहे केंद्राचा व राज्याचा टॅक्स जास्त असल्यामुळे पेट्रोल व डिझेल अतिशय महाग मिळत आहे हा टॅक्स कमी करून पेट्रोल डिझेल चे किमती कमी कराव्यात.
तसेच चीनने भारतावर आक्रमण करून त्यामध्ये शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना आदरांजली म्हणून भारताने चीन सोबत चे सर्व करार रद्द करावेत चिनी मालाची भारतामध्ये होणारी विक्री थांबवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली
या निवेदनावर जिल्हाप्रमुख अनिल हजारे लाखन गायकवाड सुरज वाघमारे मनोज मुंडे आदींच्या सह्या आहेत.






