Nandurbar

सुफी संत हजरत ख्वाजा मोईनोदीन चिश्ती यांच्या बद्दल अपशब्द वापरणाऱ्या दोषींवर कार्यवाही व्हावी मा. पोलीस निरीक्षक यांना निवेदन

सुफी संत हजरत ख्वाजा मोईनोदीन चिश्ती यांच्या बद्दल अपशब्द वापरणाऱ्या दोषींवर कार्यवाही व्हावी मा. पोलीस निरीक्षक यांना निवेदन

फहिम शेख

जगातील सुप्रसिद्ध हिंदू मुस्लीम व बुद्धधिस्ट सर्व जाती धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले सुफी संत हजरत ख्वाजा मोईनोदीन चिश्ती ( गरिब नवाज रहे )यांच्या विषयी अपशब्द वापरणारा न्युज 18 इंडिया चा एडिटर अमीश देवगन व चैनलचे सी ई ओ विरूद्ध कडक व सक्तीची कारवाई होणे आणि तात्काळ गुन्हा दाखल होणे विषयी भीम आर्मी नंदुरबार जिल्हा द्वारे निवेदन देण्यात आले.

सदर निवेदनात म्हणले आहेत की देशातील राजस्थान राज्यातील अजमेर येथे हिंदू मुस्लीम व बुद्धधिस्ट सर्व जाती धर्मियांच्या श्रद्धास्थान असलेले महान सुफी संत हजरत ख्वाजा मोईनोदीन चिश्ती (गरिब नवाज रहे) यांच्या विषयी न्युज 18 इंडिया याचे एडिटर अमीश देवगन याने अपशब्द वापरून देशातील मुस्लिम बांधवांची मने दुःख वली सदरील चैनलचे परवाने रद्द करून एडिटर व सी ई ओ विरुद्ध कडक व सक्तीची कारवाई करण्यात यावी.

जगातील सुप्रसिद्ध सर्व जाती धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या महान सुफी संत हजरत ख्वाजा मोईनोदीन चिश्ती गरिब नवाज रहे यांच्या विरुद्ध वापरलेले अपशब्द मुळे मुस्लिम बांधवांच्या भावनां दुखावल्या आहे महाशयांना कडकडीची नम्र विनंती करण्यात येथे की सदरील न्युज चॅनलवर तातडीने कारवाई करण्यात यावी के यापुढे कोणत्याही चैनल अशी हरकत करणार नाही.

सोसिअल डीसटनसिंगच्या पालन करून फक्त 4 पदाधिकारी तर्फे निवेदन देण्यात आले आहेत. यावेळी भीम आर्मी पदधिकारी व कार्यकर्ता संजू भाऊ रगडे,(नंदुरबार जिल्हा अध्यक्ष भीम आर्मी),मुजम्मील भाऊ हुसैन,(नंदुरबार अल्प. जिल्हा अध्यक्ष भीम आर्मी),लोटन पेंढारकर,(नंदुरबार जिल्हा प्रवक्ता भीम आर्मी)सलमान शेख (नंदुरबार शहर अल्प. अध्यक्ष),मुन्ना एलमार(भीम आर्मी नंदुरबार प्रमुख सदस्य),नूर शिकलीगर,(नंदुरबार शहर कार्याध्यक्ष भीम आर्मी),रोहित भालेराव (भीम आर्मी कार्यकर्ता) इ उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button