Maharashtra

वाढीव वीजबिलाबाबत महावितरणला निवेदन।

वाढीव वीजबिलाबाबत महावितरणला निवेदन

चांदवड प्रतिनिधी उदय वायकोळे

चांदवड नगरपरिषदचे नगरसेवक अल्ताफ तांबोळी व नागरिक यांनी उपकार्यकरी अभियंता चांदवड श्री उमेश पाटील साहेब यांना वाढीव वीजबिलाबाबत निवेदन दिले. सध्या सुरू असलेल्या कोरोना परिस्थितीमुळे तीन महिन्यापासून सामान्य नागरिक,घरगुती ग्राहक,व्यापारी,मजूर पैशाने अडचणीत सापडले आहे.कोविड काळात 3 महिने वीज मीटर चे रिडींग घेण्यात आले नव्हते आता काही ग्राहकांना 3.5 महिन्यांचे बिल देण्यात आल्याने बिलाची रक्कम जास्त आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे,तरी स्लॅब बदलल्याने जास्त आलेली बिले दर महीन्या प्रमाणे विभागून केल्यास वीज बिल कमी होईल असे नागरिकांचे म्हणणे आहे.तरी शहरातील गोरगरीब जनतेचा विचार करून कार्यवाही व्हावी अश्या आशयाचे निवेदन देऊन विचार व्हावा अशी मागणी नगरसेवक अल्ताफ तांबोळी व नागरिकांनी केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button