Maharashtra

फैजपूर ला पुन्हा 5 जणांना कोरोना ची बाधा ,एकूण बाधीत संख्या 31 वर

फैजपूर ला पुन्हा 5 जणांना कोरोना ची बाधा ,एकूण बाधीत संख्या 31 वर

प्रतिनिधी सलीम पिंजारी

येथील दक्षिण बाहरपेठ व भुसावळ रोड -विद्यानगर भागात पुन्हा आज रोजी 1महिलेसह 4 एकाच परिवारातील नागरिकांना कोविड19 ने संक्रमित झाल्याचा रिपोर्ट जिल्हा प्रशासनाकडून सकाळी नपा प्रशासनास प्राप्त झाले आहे त्यामुळे या रुग्णांचे संपर्कात आलेल्या व्यक्ती चा शोध कार्याने वेग घेतला आहे यात काही व्यक्ती ना कॉर्नटाईन करण्यात आले आहे व सदर भागात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात येत असून फैजपुरात दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आदळत असल्यामुळे प्रशासनावर आता कसोटी चा सामना करावा लागत आहे गेल्या काही महिन्यात पूर्वी सर्वत्र कोरोना संसर्ग सुरू होते त्यावेळेस फैजपुरात दोन ते अडीच महिन्यापर्यंत एकही रुग्ण पॉझिटिव्ह मिळाला ना होता परंतु गेल्या महिन्याभरापासून फैजपुरात दररोज पॉझिटिव्ह रुग्ण मिळत असल्यामुळे प्रशासन हतबल झाले असल्याचे चित्र दिसत आहे तसेच गेल्या काही दिवसापासून लोक डाऊन काही प्रमाणात सुरु झाल्या पासून बाहेरून येणाऱ्या व जाणाऱ्या तसेच लाक डाउन व माक्स तसेच सोशल डिस्टन्स चे पालन होत नसल्याचे दिसत असल्यामुळे कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे सुज्ञ नागरिकांमध्ये बोलले जात आहे तरी प्रशासनाने अधिक कठोर भूमिका घेण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button