Maharashtra

अन्यथा मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी शेतकऱ्यांचा ज्वारी,मका खाली करू

अन्यथा मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी शेतकऱ्यांचा ज्वारी,मका खाली करू
आ.मंगेश चव्हाण.
शेतकी संघाच्या गोंडस नावाखाली शेतकऱ्यांना नाडणाऱ्याना जनतेसमोर उघडे करणार असल्याचा दिला इशारा

प्रतिनिधी मनोज भोसले

कापूस व मका फेकून शेतकऱ्यांचा चाळीसगावात राज्य शासनाविरुद्ध एल्गार,
आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली चाळीसगावात ठिय्या आंदोलन

चाळीसगाव प्रतिनिधी मनोज भोसले- शेतकऱ्यांचा शेतीमाल खरेदी करणे ही राज्य शासनाची जबाबदारी आहे, इतर तालुक्यांच्या मानाने सर्वात कमी नोंदणी चाळीसगाव तालुक्यात झालेली असताना देखील सर्वात कमी कापूस, मका व ज्वारी चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची खरेदी झालेली आहे. मका व ज्वारी जी थोडीफार खरेदी झाली त्यात शेतकी संघाच्या व्यवस्थापन व चेअरमन यांनी स्वतःच्या मर्जीतले थोडेफार शेतकरी व काही विशिष्ट व्यापारी यांचे नाव पुढे करून गैरव्यवहार केला. त्यामुळे खरे शेतकरी बाजूला राहिले आणि दलालांचे फावले. याबात शेतकी संघाची विभागीय चौकशी सुरु आहे. मी मागील ४ महिन्यांपासून यासाठी पाठपुरावा करत आहे, लेखी पत्रव्यवहार केला. मात्र गेंड्याच्या कातडीचे सरकारने स्वताला कोरोनापासून वाचवण्यासाठी क्वारंटाइन करून घेतले आहे. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न दिसत नाहीत. मका व ज्वारी खरेदीसंदर्भात योग्य निर्णय न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर शेतकऱ्यांचा मका व ज्वारी खाली करू. म्हणून आज आमदार म्हणून नव्हे तर शेतकऱ्याचा मुलगा म्हणून सरकारचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलो आहे. शेतकी संघाच्या गोंडस नावाखाली शेतकऱ्यांना नाडणाऱ्यांना जनतेसमोर उघडे पाडल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी दिला. यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी शेतकी संघाचे अध्यक्ष शशिकांत साळुंखे यांना खुले आव्हान दिले की, थोडीफार जरी नैतिकता शिल्लक असेल तर सर्व अधिकारी व कागदपत्रे घेऊन माझ्यासमोर यावे आणि खुलासा करावा अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन छेडले जाईल.
चाळीसगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपा व तालुक्यातील कापूस – मका उत्पादक शेकऱ्यांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या घरात पडून असलेला कापूस, मका व ज्वारी तात्काळ खरेदी करण्यात यावी, शेतकी संघाच्या वतीने मका व ज्वारी खरेदीत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अश्या प्रमुख मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती पोपटतात्या भोळे, संजय गांधी निराधार समितीचे तालुकाध्यक्ष के बी साळुंखे, नगराध्यक्षा सौ.आशालताताई विश्वास चव्हाण, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम सर , शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, पंचायत समितीचे गटनेते संजय भास्करराव पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सरदारशेठ राजपूत, माजी सभापती रवीआबा पाटील, जेष्ठ पदाधिकारी उद्धवराव माळी पाटील, माजी तालुकाध्यक्ष सुरेश तात्या सोनवणे, नगरपालिका गटनेते संजू आबा पाटील, नगरसेवक नितीन पाटील, भास्कर पाटील, अरुण अहिरे, सोमसिंग राजपूत, चंद्रकांत तायडे, चिराग शेख, नगरसेविका सौ.विजयाताई पवार, पं स सदस्य सुभाष दादा पाटील, पियुष साळुंखे, मार्केट कमिटी संचालक सौ.अलकनंदाताई भवर, संघटन सरचिटणीस धनंजय मांडोळे, अमोल चव्हाण, महिला मोर्चा शहराध्यक्ष सौ.संगीताताई गवळी, डॉ. महेंद्र राठोड, शहर सरचिटणीस अमोल नानकर, जितेंद्र वाघ, योगेश खंडेलवाल, युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष कपिल पाटील, माजी नगरसेवक संजय घोडेस्वार, शहर प्रसिद्धीप्रमुख प्रवीण मराठे, माजी कार्यालय मंत्री अरुण पाटील, वाघळीचे सरपंच विकास चौधरी, रोहिणीचे सरपंच अनिल नागरे, युवा मोर्चा माजी तालुकाध्यक्ष रोहन सूर्यवंशी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सुनील पवार, शहराध्यक्ष भावेश कोठावदे, कायदा आघाडीचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील, अल्पसंख्यांक आघाडीचे अयास पठाण, नगराज महाजन, भरत गोरे, सुनील पवार, मनोज गोसावी, जगदीश चव्हाण, राजेंद्र पाटील, प्रदीप देवरे, चेतन पाटील, रामकुमार पाटील, दिनेश महाजन यांच्यासह अनेक मान्यवर सरपंच, ग्रा.प.सदस्य भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी – कार्यकर्ते व तालुकाभरातील कापूस व मका – ज्वारी उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
आमदार मंगेश चव्हाण व शेतकऱ्यांनी शेतकी संघ व राज्य शासनाच्या विरोधात घोषणा देत आंदोलनाच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आणलेला कापूस, मका, हरभरा रस्त्यावर फेकून राज्य शासनाचा निषेध केला. यानंतर सर्व आंदोलकांनी बैलगाड्यावर बसून छत्रपती शिवाजी महाराज चौंक ते चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन पर्यंत मोर्चा काढत स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याठिकाणी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसिलदार अमोल मोरे यांना शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांविषयीचे निवदेन देण्यात आले.

आपल्या मनोगतात आमदार चव्हाण पुढे म्हणाले की, आज ज्या गतीने खरेदी होत आहे ते पाहता पुढच पिक आल तरी माल खरेदी होणार नाही. पाऊस सुरु झाल्याने कापूस व मका खराब व्हायला लागला आहे. एकीकडे शेतकऱ्यांना कोरोना मारत आहे तर दुसरीकडे हे तिघाडी सरकार जगू देत नाही आहे. शेतकी संघात १०० क्विंटल हरभरा मार्केट कमिटी मधून खरेदी करून व्यापारी विकत असताना आम्ही रंगेहाथ पकडला. शेतकी संघाचे चेअरमन म्हणतात की आमदार स्टंट करत आहेत मी त्यांना सांगतो की मी आमदार नंतर आहे आधी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. आता कोणती निवडणूक नाही, आमचे सरकार नाही, कोरोनामुळे चांगले चांगले पुढारी घराबाहेर निघत नाही आहेत. मला जर स्टंट करायचा राहिला असता तर मी घरात बसून कागद फिरवले असते, फेसबुक लाइव घेतले असते. मी ज्या दिवशी आमदार झालो त्या दिवशी मी ठरवल होत की माझ्या चाळीसगाव तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी उन वारा पाउस मी पाहणार नाही. कोरोनाच्या काळात मागील ४ महिन्यांपासून जनतेत आहे त्यांची सेवा करत आहे आणि आज शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. शेतकी संघ हा शेतकऱ्यांचा घात करणारा घातकी संघ झाला आहे. शेतकरी उपाशी आणि मुठभर पुढारी व ठराविक व्यापारी तुपाशी अस यांच धोरण आहे. शेतकऱ्याला कुठलीही जात –पात – पक्ष – गट नसतो. मात्र त्यात सुद्धा भेदभाव करण्याचे पाप शेतकी संघाने केले आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या विश्वासाने तुमच्या हातात कागदपत्रे दिली, आणि तुम्ही त्यांचा विश्वासघात करून तुमच्या जवळच्या लोकांची आणि ठराविक व्यापाऱ्यांची नावे ऑनलाईन नोंदणी केली. याप्रकरणी मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक यांनी चौकशी लावली आहे. शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारे जे कुणी असतील त्यांना तालुक्यासमोर उघडे केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. तुमच्या आशिर्वादाने मी आमदार झालो आहे त्यामुळे तुम्हाला अडचणीत आणणाऱ्याची गय केली जाणार नाही, बनावट खत असो, गांजा – गुटखा २ नंबरचे धंदे असो की लाच घेणारे अधिकारी – कर्मचारी असो अन्यायाच्या व चुकीच्या गोष्टींच्या विरोधात नेहमीच तुमचा आवाज बनून मी लढणार असल्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले.
प्रा.सुनील निकम यांनी सूत्रसंचालनाच्या माध्यमातून आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. भाजपाचा डीएनए संघर्षाचा असून जनतेसाठी आम्ही सदैव रस्त्यावर यायला तयार असल्याचे सांगितले. के बी दादा साळुंखे यांनी आपल्या मनोगतातून राज्य सरकार व शेतकी संघाचे वाभाडे काढले. शेतकी संघाचे चेअरमन जर पारदर्शक व्यवहाराच्या बाता करत असतील त्यांनी नोंदणी केलेल्या मका व ज्वारीच्या शेतकऱ्यांच्या याद्या तहसिलदार व आमदार यांना का दिल्या नाहीत असा सवाल करत शेतकी संघाच्या पापाचे घडे भरले असल्याची टीका यावेळी के बी दादा साळुंखे यांनी केली.
संजय भास्करराव पाटील यांनी आमदारांचे वय कमी असल्याच्या टीकेचा खरपूस समाचार घेत आमदार वयाने जरी छोटे असले तरी कामाने आणि मनाने मोठे आहेत. मागील ६ महिन्यात आपल्या कामाच्या शैलीने त्यांनी जनमानसात आपले स्थान निर्माण केले आहे. कोरोनाच्या काळात आमदार मंगेश चव्हाण यांनी जनतेत फिरून त्यांच्या अडीअडचणी सोडविल्या, अन्नसेवा, औषध फवारणी, औषधी वाटप केले तेव्हा तुमचे जाणकार अनुभवी नेते काय करत होते असा प्रतिप्रश्न पाटील यांनी केला.
डॉ.सुभाष निकुंभ यांनी शेतकी संघाचे चेअरमन यांच्या भ्रष्ट कारभाराचे वाभाडे काढत याविरोधात प्रथमच आवाज उचलणारे आमदार मंगेश चव्हाण यांचे अभिनंदन करत आंदोलनाला पाठींबा दिला. पोपट तात्या भोळे यांनी केंद्र सरकारच्या शेतकरी हिताच्या योजनांची माहिती देत प्रथमच शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव मोदी सरकारने दिला आहे मात्र फक्त शेतीमाल खरेदी करण्याची सक्षम यंत्रणा देखील राज्य शासन उभारू शकत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले.
सौ.संगीताताई गवळी यांनी महाविकास आघाडी सरकारची तुलना गांधीजींच्या तीन आंधळ्या, मुक्या व बहिऱ्या माकडांसोबत करत कोरोनामुळे जनतेने मास्क घातला असल्याने ते सरकारच्या चुकीच्या बाबींवर बोलणार नाहीत असा समज या क्वारंटाइन सरकारने केला असल्याची टीका त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या वतीने छबूलाल गढरी (मेहूणबारे) बालाजी पवार (धामणगाव), शामराव चव्हाण (शिरसगाव), आण्णा मराठे (करगाव), युवराज महाडिक (तरवाडे पेठ), येथील शेतकऱ्यांनी त्यांना मका व ज्वारी नोंदणी साठी शेतकी संघात आलेला अनुभव कथन केला. एकाच वेळी ५ वेगवेगळ्या उताऱ्यावर नोंदणी करून फक्त एकच उताऱ्याची खरेदी झाली मग बाकीच्या बरोबरच्या उताऱ्यांचे काय झाले? मका शेतात सडत आहे, कर्ज काढून आम्ही उत्पन्न काढले मात्र माल विकला न गेल्याने आम्ही नवीन हंगामासाठी खर्च कुठून करायचा. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचा घात केल्याची भावना यावेळी शेतकऱ्यांनी बोलून दाखविली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button