Maharashtra

राज्यातील जातीय अत्याचाराच्या घटनांची चौकशी करा

राज्यातील जातीय अत्याचाराच्या घटनांची चौकशी करा
दोषींवर कारवाई करण्यासाठी
मुख्यमंत्री यांना दिले निवेदन
वंचित बहुजन आघाडी चे निवेदन

चिमूर ज्ञानेशवेर जुमनाके

महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी विचारसरणी चे राज्य असताना राज्यात अनेक जातीय अत्याचाराच्या घटना घडल्या असून त्या त्या घटनेतील दोषींवर कडक कारवाई करण्यासाठी उपविभागीय अधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना वंचीत बहुजन आघाडी चिमूर तालुका अध्यक्ष स्नेहदीप खोब्रागडे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले
महाराष्ट्र राज्य छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा ज्योतिबा फुले राजश्री शाहू महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा व विचारांचा ठसा असताना राज्यात जातीय अत्याचाराच्या दहा घटना घडल्या असताना मात्र कारवाई थंडबसत्यात आहे त्या घटनांत अरविद बनसोडे रा पिपळधारा ता नरखेड जी नागपूर यांची 27 मे ला भर रस्त्यात हत्या केली . विराज जगताप रा पिंपळे सौदागर जिल्हा पुणे या तरुणावर सहा सात तरुणांनी हल्ला केला तेव्हा तो मृत्यू पावला .दगडू धर्मा सोनवणे रा महिंदळे ता भडगाव जी जळगाव यांच्या घरावर हमला करून महिलांवर विनयभंग करण्यात आले . साळापुरी जी परभणी येथील पाच तरुणांवर भीषण हल्ला केला. राहुल अडसूळ ता कर्जत जी अहमदनगर येथील गावातील लोकांनी मिळून हल्ला केला. चदनापुरी खुरदी ता अंबगड जी जालना येथील बौद्ध परिवाराला टोळीने मारहाण केली . मठा जि जालना येथील शिक्षकांला उच्चवर्णीय कडून शिवीगाळ मारहाण केल्याने आत्महत्या करण्यास भाग पाडले .निळा ता सोनपेठ जी परभणी या गावातील बौद्ध महिला सरपंच यांना कोरोना संदर्भात मारहाण करून पतीस बेदम मारहाण केली. वैजापूर जी औरंगाबाद आंतरजातीय प्रेम प्रकरणात कुटुंबातील सदस्यांची हत्या करण्यात आली. नागदरा ता परळी जी बीड येथील होलार समाजातील बांधवावर हल्ला करण्यात आले . सदर घटनांत बौद्ध बांधवावर जातीय अत्याचार करण्यात आले असून सदर सर्व घटनेतील चौकशी ही थातूरमातूर करण्यात आली असून दोषींवर कडक करण्यात यावी यासाठी वंचित बहुजन आघाडी तालुका चिमूर च्या वतीने कारवाई ची मागणी करीत पुणे अहमदनगर बीड नागपूर व महाराष्ट्रातील इतर अत्याचार प्रवण भागासह प्रत्येक जिल्ह्यात अन्यय विशेष न्यायालये स्थापन करण्यात यावे ,अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याच्या कलम 15 नुसार अरविद बनसोडे आणि विराज जगताप या अत्याचारासह इतर सर्व प्रकरणातील तक्रारदाराच्या मागणीनुसार विशेष सरकारी वकील नियुक्त करणे, प्रत्येक जिल्ह्यात सामाजिक दृष्ट्या जागरूक पोलीस निरीकक्षाची ओळख करून घ्यावी आणि सर्व जातीय अत्याचाराची चौकशी करण्यात यावी ,पीसीआर आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याच्या अंमलबजावणी चा आढावा घेणे यासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय दक्षता आणि देखरेख समितीची तातडीची बैठक घेणे आणि महाराष्ट्र सरकारच्या गृह मंत्रालय मार्फत 2 फेब्रुवारी 2019 रोजीच्या अधिसूचनेनुसार स्थिती अहवाल प्रकाशित करणे आणि अनुसूचित जाती जमाती अधिनियम आणि नियमाच्या नियम 1 अंतर्गत तातडीने मॉडेल आकस्मिक ता योजना आनने या मागण्यांसाठी चे सुद्धा निवेदनात नमूद करण्यात आले
वंचित बहुजन आघाडी तालुका चिमूर तालुका अध्यक्ष स्नेहदीप खोब्रागडे यांच्या नेतृत्वात निवेदन देत असताना शालीक थुल, नीलकंठ शेंडे ,शुभम मंडपे मनोज राऊत ,रामेश्वर गजभिये जनार्धन खोब्रागडे सुखदेव गजभिये उपस्थित होते .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button