आशा कर्मचारी बांधकाम कामगारांसह सफाई भरती बाबत पालकमंत्र्यांना साकडे.
सीटु राष्ट्रीय उपध्यक्ष ङाॅ ङी एल कराङ यांची मागणी,
नाशिक जिल्हा प्रतिनिधी. शांताराम दुनबळे
नाशिक-:कोरोना विरुद्धच्या लढाईत आघाडीवर असलेल्या आशा कर्मचारी व गटप्रवर्तक , बांधकाम कामगार आणि सफाई कर्मचारी ठेक्याबाबत पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे यासाठी सीटूच्या वतीने निवेदनाद्वारे त्यांना साकङे घालण्यात आले आहे . आशा कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन आहे . या संदर्भात कर्मचाऱ्यांनी ३ जुलैपासून संपावर जाण्याची नोटीस दिलेली आहे . आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आशा कर्मचाऱ्यांचे मानधन वाढीबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगितले . परंतु , आशा कर्मचाऱ्यांबरोबरच त्यांच्यावर सुपर्विजन करणाऱ्या गटप्रवर्तक यांचे मानधन त्याचवेळी वाढविणे आवश्यक आहे . त्यामुळे आशा कर्मचारी आणि गटप्रवर्तक यांचे मानधन वाढीचा योग्य निर्णय एकत्रितपणे करावा , अशी मागणी सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ . डी . एल . कराड यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे . राज्यातील बांधकाम मजुरांना इमारत व इतर बांधकाम कामगार कल्यान महामंडळातर्फे लाॅकडाउन काळात दोन हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे . परंतु लॉकङावुन होऊन तीन महिने झाले आहेत व अजूनही बांधकामे पूर्ववत सुरू झालेली नाहोत . त्यामुळे या कामगार व त्यांच्या कुटुंबियांना उपासमारीची वेळ आली आहे . बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे भरपुर निधी उपलब्ध आहे . त्यामुळे पुन्हा एकदा अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेतला जावा व याबरोबरच महानगरपालिकेमध्ये आउटसोसिंगच्या माध्यमातून सातशे सफाई कामगार यांची भरती करण्यात येत आहे . सफाईचे काम अत्यावश्यक नियमित व कायम स्वरूपाचे आहे . त्यामुळे आउटसोर्सिंग द्वारे या कामासाठी नोकर भरती करणे गैर व बेकायदेशीर आहे . तसेच सफाचे काम करणारे व्यक्ती या प्रामुख्याने मागासवर्गीय , आदिवासी मेघवाळ अल्पसंख्यांक व गरीब ओबीसी जातीतून येतात . त्यामुळे ठेकेदारी पध्दतीने त्यांचे मोठ्या प्रमाणात शोषण होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून सफाई कामगारांची भरती आउटसोर्सिंगच्या माध्यमातून न करता महापालिकेतर्फे नियमीत स्वरूपात करण्यात यावी , अशी मागणी डॉ . कराङ यांनी निवेदनाद्वारे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे .






