मंगरूळ येथे निर्जंतुक फवारणी करून आर्सेनिक अल्बम गोळ्याचे वाटप… पर्यावरण मंत्री मा,आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीकांत पाटील यांनी राबवला उपक्रम…
प्रतिनिधी रजनीकांत पाटील
अमळनेर :राज्याचे पर्यावरण मंत्री मा,आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील मंगरूळ येथे कोरोना विषाणू पासून दक्षता म्हणून संपूर्ण गाव सॅनिटायझेशन करून गावात आर्सेनिक अल्बम गोळ्याही वाटप करण्यात आले.
यावेळी ग्रामविकास शिक्षण मंडळाचे चेअरमन व युवा सेनेचे कार्यकर्ते श्रीकांत अनिल पाटील यांनी स्वखर्चाने गावात कोरोना बाधित एकही रुग्ण नसताना हा उपक्रम राबविण्यात आला,
गावातील कानाकोपऱ्यात यंत्राने सॅनिटायझर फवारणी केली आणि गावात सर्व ग्रामस्थांना प्रतिकार शक्ती वाढावी म्हणून आर्सेनिक अल्बम (30) गोळ्या वाटप केले तसेच नागरिकांना मास्क ,सोशल डिस्टसींग बाबत जनजागृती करण्यात आली.
तरी या वेळी सुरक्षित अंतर ठेवून समाधान पारधी,विक्की पाटील,पंकज पाटील, ग्रामपंचायत सदस्य किशोर पाटील,चंद्रशेखर पाटील यांनी या उपक्रमाला सहकार्य केले.






