मोठा वाघोदा कोरोना बचाव समिती कागदावरच अध्यक्ष गैरहजर बाकीच्यांची तारेवरची कसरत
मोठा वाघोद्यात कोरोनाचा कहर पॉझिटिव्ह रुग्ण दोन मयतासह संख्या १० वर
प्रतिनिधी मुबारक तडवी
पाटील पुरी वस्तीतील मयत वृध्दासह रजा कॉलनी तील प्रथम संक्रमित आढळलेल्या महिलेच्या कुटूंबातील स्वॅब तपासणी कामी क्वारंटाईन केलेल्या १९ व्यक्तीपैकी आज ५ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून यात एका सहा महिन्यांच्या बाळ ही संक्रमित झाल्यामुळे मोठा वाघोदा गावात खळबळ उडाली असून बाधित रुग्ण संख्या १० झाल्याने गावकर्यात भितीचे वातावरण पसरले आहे.
तसेच कंटेंटमेंट झोन मधील प्रतिबंधित क्षेत्र सील करण्यात आले असुन संक्रमित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना शोधण्याचे मोठे आवाहन आरोग्य प्रशासनासमोर आहे कारण संक्रमित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना शोध घेवून स्वॅब तपासणी कामी क्वारंटाईन करण्यात यावे जेणेकरून कोरोना या महाभयंकर आजाराची साखळी तोडण्यासही मदत होईल असे मत मोठा वाघोदा येथील जनमाणसातून व्यक्त केला जात आहे






