शेतकरी पुत्राचे मुख्यमंत्र्यांना पत्र,पीक कर्जाबाबत लक्ष घालण्याची मागणी..
प्रतिनिधी शांताराम दुनबळे
नाशिक-:कर्जमाफी संदर्भातल्या महाराष्ट्र सरकारच्या नवीन आद्यदेशानुसार ज्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये माफीची रक्कम जमा झालेली नाही,ती शासनाकडून येणे बाकी अश्या रकान्यात टाकावी व शेतकऱ्याला नवीन कर्ज उपलब्ध करून द्यावे असे आदेश राज्य सरकारने दिले आहे,परंतु सरकार च्या या सूचनेला बँकांनी हरताळ फासल्याचे जनार्दन धनगे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी केलेल्या पत्रव्यवहारात म्हंटले आहे.शासनाने महात्मा फुले कृषी सन्मान योजने अंतर्गत जी काही कर्जमाफी केली ती दिलासादायक आहेच परंतु येत्या खरिप हंगामासाठी शेतकऱ्याला वेळीच कर्ज न मिळाल्यास परत सावकाराच्या दारात जावे लागेल.
आधीच कोरोनाने मागील पिकांना विकण्यात अनंत अडचणी आल्या,अश्या स्थितीत रिझर्व्ह बँक , नाबार्ड यांच्याशी सरकारने समनव्य साधावा अशी मागणी धनगे यांनी केली आहे.जिल्हा बँका राष्ट्रीयकृत बँका आज शेतकऱ्याला दारात उभं करायला तयार नाही’आम्हाला रिझर्व्ह बँकेची हमी हवी असे सांगून बँका आपला हात आखडता घेत आहे.शेतकऱ्याला आता तातडीच्या पीक कर्जाची गरज असून काही ठिकाणी आंदोलने सुरू झाली आहे,त्यामुळे या महत्वपूर्ण मुद्य्यावर सरकारने वेळीच लक्ष घालावे अशी मागणी धनगे यांनी पत्राद्वारे केली आहे.






