कोरोनामुक्त मोठा वाघोदा कोरोनाग्रस्त झालेच.सरपंचांची पुन्हा दांडी कोरोना पॉझिटिव्ह ४ संक्रमित झाले संबंधित कोरोना चां विस्फोट होण्याची वाट बघतेय का?
बेजबाबदार सरपंच, यांचा कामचुकारपणा कर्तव्यात कसूर स्पष्ट दिसुनही जिल्हाधिकारींसह संबंधित प्रशासनाकडून कारवाईस दिरंगाई का?
प्रतिनिधी मुबारक तडवी मोठा वाघोदा
दि.८ जून ला पहिली रजा कॉलनी तील रहिवासीमहिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती त्यानंतर गावात एकच खळबळ उडाली होती त्यात संक्रमित रुग्णांत भर पडत दि ११ जून रोजी रजा कॉलनी तील याच महिलेच्या घरातीलच दोन नातवंडाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे त्यांच बरोबर सातमधील महादेव मंदिर परिसरातील मयत पुरुषाचा अहवाल ही कोरोना पॉझिटिव्ह आला असून त्यांचे संपर्क आलेल्या कुटुंबातील ६ व्यक्तींना स्वॅब तपासणी साठी रवाना करण्यात आले मात्र लोकनियुक्त सरपंच सह प्रभारी ग्रामसेवक यांना नागरिकांच्या जिवाची काही एक पर्वा व सोयरसुतक नसलेल्या १७ सदस्यिय ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच आहेत जगात कोरोना या महाभयंकर आजाराने थैमान घातलेले असताना शासनाने लॉकडाऊंन केले जनजिवन भयभीत झाले याचं ऐन कसोटीत लोकनियुक्त सरपंच यांनी ग्रामपंचायतीला दांडी मारत दुर्लक्ष केले व आपला वाघोदा गावातील रहिवासही सोडला व आपला निवास यावल तालुक्यातील अकलूज ( भुसावळ) येथे करुन मोठा वाघोदा वासीयांना संकटकाळी धीर देण्याऐवजी उपाय योजना सोई सुविधा उपलब्ध करण्या ऐवजी गावाच सोडून इतर तालुक्यातील निवासी झाले व धग्रामपंचायतीकडे ही दुर्लक्ष केले त्यामुळे ग्रामविकास अधिकारी यांचेवर कार्यालयीन कामकाजाचा ताण वाढला व तो असह्य झाल्यामुळे अर्जित सुट्टी घेत त्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
पण मोठा वाघोदा वासियांचा जीवच धोक्यात टाकीत या महाशयांनी त्यांच्या बेजबाबदारपणा कर्तव्यात कसूर,कर्मशुन्यतासह जबाबदारी झटकत जाणूनबुजून हेतूपुरस्सर दुर्लक्ष करीत गावकर्याना जिवनमरणाच्या दारात आणून उभं केलं आहे आणि कोरोनामुक्त गावास कोरोना ग्रस्त करणेस कारणीभुत ठरले व पुढील अनर्थास ही पात्र ठरतील असा संकटकालीन प्रश्न ही जनमानसात निर्माण झाला आहे संबंधित प्रशासनाकडून वेळीच दखल घेतली असती तर आज मोठा वाघोदा गाव कोरोनाग्रस्त झालेच नसते *पण प्रशासनाने ही तुम्ही बोंबला आम्ही बहिरेपणा चे सोंग करतोय* हा पवित्रा अवलंबून गावकर्याना सरपंचासह ग्रामविकास अधिकारी यांनी खेचत नेलेल्या जिवनमरणाच्या दारात आणुन सोडले आहे व ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी वारंवार तक्रार करूनही संबंधित प्रशासनाकडून काही एक कारवाई केली गेली नसुन मोठा वाघोद्यात कोरोना महामारीचा विस्फोट होण्याची वाट बघतेय कि काय ? जळगांव जिल्हाधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रांताधिकारी फैजपूर, तहसिलदार, गटविकास अधिकारी रावेर हे या प्रकरणी गांभीर्य घेतील का? असे ऐकना अनेक प्रश्न ग्रामपंचायतीचे पदाधिकारी सह ग्रामस्थांतून उपस्थित होत आहेत.






