पिक विमा व पीक कर्जाबाबत माननीय मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याचे स्वाभिमानी रिपब्लिकन चे शशिकांत जगताप यांचे साकडे
नाशिक शांताराम दुनबळे नाशिक
खरिप हंगामातील सुरवातीलाच शेतकरी शेती कसण्यासाठी बि- बियाण्यांचे नियोजन करण्यासाठी धडपड करत असून शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे म्हणून सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ पिक कर्ज मिळण्याची तरतूद करण्यात यावी अशी मागणी स्वारिप चे शशिकांत जगताप यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
कर्ज माफी बाबत शासनाने अगोदर 2018 -19 या आर्थिक वर्षांत छञपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबविण्यात आली होती
परंतु आता महाविकास आघाडीचे मा. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सरकारने महात्मा फुले कृषी सन्मान योजनेअंतर्गत जी काही कर्ज माफी संदर्भात जो नवीन आदयादेश जारी करून कर्ज माफी केली ती दिलासादायक असली तरी शेतकऱ्यांना चालू खरिप हंगामातील पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांना वेळेतच पिक कर्ज मिळण्याची मागणी शशिकांत जगताप यांनी केली.
जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जाणारा शेतकरी आर्थिक संकटात सापडलेल्या परिस्थितीत सावकारी कर्ज घेण्यासाठी सावकराचे घराचे उंबरठे झिजवणयाशिवाय पर्याय नाही एकिकडे जिल्हा बॅक, राष्ट्रीयकृत बॅक शेतकऱ्यांना रिझर्व्ह बॅकेची हमी असल्याशिवाय दारात उभं करायला तयार नाहीत म्हणुन सरकारने तातडीने शेतकऱ्यांना पिक विमा व पीक कर्ज मिळण्यासाठी लक्ष घालून पिक कर्ज उपलब्ध करून दिलासा द्यावा अशी मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुका सचिव शशिकांत जगताप यांनी पत्रकाद्वारे केली आहे.






