AmalnerMaharashtra

?️ Big Breaking.. अमळनेर चे उपविभागीय पोलीस अधीक्षक ससाणे यांचे अपघातात दुःखद निधन….

?️ Big Breaking.. अमळनेर चे उपविभागीय पोलीस अधीक्षक ससाणे यांचे अपघातात दुःखद निधन….ठोस प्रहार परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली…

प्रा जयश्री दाभाडे

अमळनेर चे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र ससाणे सुटी निमित्त 2 दिवस घरी जात असताना वडाले भोई गावा जवळ 150 फूट दरीत गाडी कोसळली
त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.यामुळे अमळनेर शहरावर शोककळा पसरली असून पोलीस विभागातील अत्यंत मनमिळाऊ मोजकं च बोलणारे पण मुद्देसूद बोलणारे
अत्यंत सालस स्वभावाच्या अधिकारीचा अकस्मात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

साहेब इतक्या दिवसांपासून अमळनेर ला होते पण कधीच त्यांना जोरात बोलताना पाहिले नाही.नम्र पणे हळूच मान हलवून संमती किंवा नकार दर्शविणारे साहेब एक चांगले अधिकारी म्हणून कायम लक्षात राहतील.

साहेबांच्या जाण्याने प्रशासकीय पोकळी निर्माण झाली आहे.अमळनेर च्या प्रशासकीय वर्तुळातील ही पोकळी भरून काढणे अशक्य आहे.अमळनेर शहरात अनेक अधिकारी आले गेले पण मोजकेच अधिकारी आपलं नाव आणि प्रभाव सोडून गेले त्यातीलच एक उत्तम प्रशासक, एक उत्तम अधिकारी, एक चांगला पिता, एक चांगला मित्र ,पोलीस कर्मचाऱ्यांचा वरिष्ठ असले तरी उत्तम सहकारी आज सर्वांनी गमावला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button